अमित शहांनी सांगितले नेत्यांचे तीन प्रकार...तुमचे नेते यातील कोणत्या प्रकारात? - HM Amit Shah praises PM Modi for his devlopmental work | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अमित शहांनी सांगितले नेत्यांचे तीन प्रकार...तुमचे नेते यातील कोणत्या प्रकारात?

वृत्तसंस्था
रविवार, 11 जुलै 2021

गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गुजरामध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले.

अहमदाबाद : गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गुजरामध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुकही केलं. पंतप्रधान मोदी हे असे नेते आहेत, जे आपला कार्यकाळ संपल्यानंतरही विकासकामे पुढे सुरूच राहतील, याची खात्री देतात, असे शहा म्हणाले. (Home Minister Amit Shah praises PM Narendra Modi for his devlopmental work)

शहा यांनी विकासकामांच्या उद्घाटनानंतर बोलताना नेत्यांचे तीन प्रकार सांगितले. ते म्हणाले, मी तीन प्रकारचे नेते पाहिले आहेत. पहिल्या प्रकारातील नेते केवळ उद्घाटन कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. दुसरे नेते त्यांच्या कार्यकाळापुरतीच विकासकामे करतात. तर तिसऱ्या प्रकारात नरेंद्र मोदींचा समावेश होतो. ते कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विकासकामे पुढे सुरूच राहतील, याची खात्री देतात, असे शहा यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा : भाजप नेत्या साध्वी प्राची यांचं मोहन भागवतांना प्रत्यूत्तर! सर्वांचा डीएनए सारखा पण...

गुजराचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी केलेल्या कामाचे कौतूक करताना शहा म्हणाले, पंतप्रधान मोदी हे पहिले नेते असतावेत, ज्यांनी पद सोडल्यानंतरही विकासकामे पुढे राहिली आहेत. त्यांच्या  14 वर्षांच्या कार्यकाळात गुजरातला खूप फायदा झाला आहे. या काळातील सुसज्ज यंत्रणेमुळं आजही विकासकामे सुरू आहेत. 

शहा तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी पश्चिम रेल्वेच्या विविध कामांसह इतर विकासकामांचे आज उद्घाटन केलं. आपल्या हस्ते 267 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन होत असल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाविषयक उपाययोजना, लसीकरणाची माहितीही त्यांनी दिली. 

अहमदाबादमधील 45 वयोगटापुढील 86 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून 18 ते 45 वयोगटातील 32 टक्के नागरिकांना लस मिळाली आहे. पण एवढे पुरेसे नाही. उर्वरित अनुक्रमे 14 व 70 टक्के लोकांचेही लसीकरण करायचे आहे. प्रत्येकाने लशीचा दुसरा डोसही घ्यायलाच हवा. यामुळं कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे, असं शहा यांनी सांगितलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता. पंतप्रधानांनी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच उत्पादन क्षमताही वाढविली जात आहे, असं शहा यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख