'रोल्स रॉइस'वरील करात सूट मागणाऱ्या अभिनेता धनुषवर न्यायालय संतापले

धनुष याने इंग्लंड येथून रोल्स रॉइस कार खरेदी केली आहे. ही कार अत्यंत महागडी असून लक्झरी कारमध्ये तिचा समावेश होतो.
High court was angry with Dhanush who demanded tax exemption on Rolls Royce
High court was angry with Dhanush who demanded tax exemption on Rolls Royce

चेन्नई : लक्झरी कार असलेल्या रोल्स रॉइस खरेदी केल्यानंतर त्यावरील आयात शुल्क माफ करण्याची मागणी करणाऱ्या अभिनेता धनुषला उच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलं आहे. मागील सहा वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. गुरूवारी झालेल्या सुनावणीवेळी धनुषने ही याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली. पण न्यायालयाने त्याला झटका देत पुढील 48 तासांत 30 लाख रुपये भरण्याचे आदेश दिला. सर्वसामान्य साबणावरही कर देतात मग तुम्ही रोल्स रॉइसवरील करात सूट कशी मागता, असा संतप्त सवालही न्यायालयानं केला. (High court was angry with Dhanush who demanded tax exemption on Rolls Royce)

धनुष याने इंग्लंड येथून रोल्स रॉइस कार खरेदी केली आहे. ही कार अत्यंत महागडी असून लक्झरी कारमध्ये तिचा समावेश होतो. इंग्लंडहून कार आयात करावी लागणार असल्याने त्यावर सुमारे 60 लाख रुपयांचा आयात कर भरावा लागणार होता. पण त्यातून सूट मिळावी यासाठी धनुषने 2015 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2018 मध्ये या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकालही दिला होता, पण त्यानंतरही कर भरण्यात आला नव्हता. 

ही बाब गुरूवारी चेन्नई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी निदर्शनास आली. तत्पूर्वी धनुषच्या वतीने त्याच्या वकिलांनी ही याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली. तसेच येत्या सहा किंवा नऊ तारखेला उर्वरित कर भरू, असंही न्यायालयाला सांगितलं. 2015 मध्ये न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानंतर 50 टक्के कर भऱल्याचेही वकिलांनी निदर्शनास आणून दिले. 

पण न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमण्यम यांनी याचिका मागे घेण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली. तसेच पुढील 48 तासांत उर्वरित सुमारे 30 लाख रुपयांचा कर भरण्याचे आदेशही दिले. श्रीमंत, नामंवत व्यक्तींकडून वाहनं आयात केली जातात अन् त्यावरील कर भरण्याचे टाळले जात असल्याचे निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. अशा प्रकारांमुळे राज्याचा महसूल बुडत असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. 

काही दिवसांपूर्वीच दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेता विजय यालाही न्यायालयानं फटकारलं होतं. त्यानेही आयात करात सूट मागितली होती. याचे पडसादही गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उमटले. सामान्य माणूस साबणावरही कर भरत असताना तुम्ही लक्झरी कारवरील आयात शुल्कात सूट देण्याची मागणी कसे करू शकता, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com