काका-पुतण्यातील संघर्ष तीव्र; चिराग पासवानांना शह देण्यासाठी काकांनी टाकला डाव

पासवान आणि पारस यांचे दोन गट पडले असून दोघांकडून वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
Bihar Politics Pashupati Paras will start Abhar Yatra in Bihar
Bihar Politics Pashupati Paras will start Abhar Yatra in Bihar

पाटणा : बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षात पुतण्या चिराग पासवानविरोधात काका पशुपती पारस यांनीच बंड केलं आहे. त्यांच्या बंडानंतर पक्षात दोन गट पडले असून आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू झालं आहे. पासवानांविरोधात केलेल्या बंडानंतर पारस यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं. त्यानंतर पावसान यांनी राज्यभर आशिर्वाद यात्रा सुरू केली. आता या यात्रेविरोधातही पारस मैदानात उतरणार आहेत. (Bihar Politics Pashupati Paras will start Abhar Yatra in Bihar)

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक पक्षाने स्वतंत्रपणे लढली. इथेच वादाची ठिणगी पडली. पारस यांच्यासह अनेकांचा चिराग यांच्या या निर्णयाला विरोध होता. पण त्यानंतरही 'एकला चलो'ची भूमिका घेतल्याने निवडणूकीनंतर पारस यांच्यासह अनेक नेत्यांनी बंड केलं. त्यांनी लोकसभेत पक्षाचा स्वतंत्र गट तयार केला. त्यानंतर पक्षात मोठा बंडाळी निर्माण झाली. पासवान आणि पारस यांचे दोन गट पडले असून दोघांकडून वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

पक्षात फूट पडल्यानंतर चिराग यांनी काही दिवसांपूर्वीच आशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत ते पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच लोकांमध्ये जाऊन पुन्हा विश्वास संपादन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या यात्रेला शह देण्यासाठी पारस यांनीही डाव टाकला असून त्यांनी 'आभार यात्रा' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा 16 ऑगस्टपासून हाजीपुर येथून सुरू करणार आहेत. 

संपूर्ण बिहारमध्ये आभार यात्रा काढली जाणार आहे. याविषयी पक्षाचे महासचिव श्रवण अग्रवाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'आभार यात्रेदरम्यान संपूर्ण बिहार राज्य पिंजून काढले जाईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटित केले जाईल. सर्व कार्यकर्त्यांना पारस हे दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्याप्रमाणे प्रेम देतील.'

लोक जनशक्ती पक्षाचे बिहारमधील अनेक भागात वर्चस्व आहे. पण दोन गट पडल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पावसान व पारस यांनीही यात्रा सुरू केल्याने आता रामविलास पासवान यांचा पक्ष नेमका कोणता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चिराग पासवान यांच्याकडून भावनिक मुद्दा करून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. पण त्यात त्यांना कितपत यश मिळणार, हे पुढील काळात दिसून येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com