Gujrat Election : अखेर गुजरात निवडणुकांच्या तारखा जाहीर ; दोन टप्प्यात होणार मतदान!

Gujrat Election : दिल्लीतील रंगभवन सभागृहात पत्रकार निवडणूक आयोगाने परिषद घेतली.
Gujrat Election
Gujrat Election Sarkarnama

दिल्ली : केंद्रिय निवडणूक आयोगाने आज दिल्लीतील रंगभवन सभागृहात पत्रकार परिषद घेतली. त्यानुसार गुजरातमध्ये 1 डिसेंबर व 5 डिसेंबर रोजी असे दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे, तर निकाल 8 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच, संपूर्ण राज्यात आचारसंहितेची अधिसूचना देखील जाहीर होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी रोजी संपत असून, यासाठी सुमारे 100 दिवस शिल्लक आहेत. राज्यात 10 ऑक्टोबर 2022 रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यावेळी गुजरात निवडणुकीत 4.9 कोटी मतदार मतदान करतील. 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत जे तरुण 18 वर्षांचे होतील त्यांनाही मतदानाची संधी दिली जाणार आहे. एकूण 4.6 लाख मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी राज्यात एकूण 51,782 केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

मतदारांच्या सोयासाठी राज्यात 142 मॉडेल मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय १,२७४ मतदान केंद्रे, अशी असतील जिथे फक्त महिला कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. प्रत्येक जिल्ह्यात असेही काही बूथ असतील जिथे तरुण निवडणूक स्वंयंसेवक तैनात केले जातील. तरुणांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे आयोगाने सांगितले. दिव्यांगांसाठी राज्यात एकूण 182 विशेष मतदान केंद्रे असतील. 80 वर्षांवरील वृद्ध आणि 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना घरूनच बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी त्यांना फॉर्म १२ डी भरावा लागेल.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना माहिती द्यावी लागेल :

मनी पॉवर किंवा मसल पॉवरचा वापर दिसल्यास मतदार आयोगाने पुरविलेल्या अॅपवर तक्रार करू शकतात. या तक्रारीवर निवडणूक आयोगाकडून 100 मिनिटांत कार्यवाही केली जाणार आहे. जर एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर असे उमेदवार का दिले हे राजकीय पक्षांना योग्य कारणांद्वारे स्पष्ट करावे लागणार आहे. याशिवाय उमेदवाराला स्वतःची माहिती प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी लागेल, असे आयोगाने सांगितले.

Gujrat Election
2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल : पंतप्रधानांची मोठी घोषणा

2017 मध्ये घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत निवडणूक आयोगाने सांगितले होते की, हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखाबरोबरच, गुजरात निवडणुका जाहीर केल्या नाहीत. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या मतमोजणीची तारीख मतदानानंतर जवळपास एक महिन्यानंतर ठेवली आहे. त्यानुसार गुजरातसाठीही मतमोजणी 8 डिसेंबर रोजीच होईल, असे निवडणूक आयोगाने याआधीच दिले होते. 2017 मध्ये देखील गुजरात आणि हिमाचल प्रदेश दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना निवडणुका जाहीर झाल्या होत्या, परंतु मतमोजणी एकाच वेळी 18 डिसेंबर रोजी झाली होती.

Gujrat Election
Rajasthan Politics : अशोक गेहलोतही आझादांच्या मार्गावर? सचिन पायलाट यांचे सूचक विधान

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये 1998, 2007 आणि 2012 मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या.182 सदस्यीय गुजरात विधानसभेचा कार्यकाळाची मुदत 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com