मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये ईडीच्या किती कारवाया झाल्या : नीलम गोऱ्हेंचा प्रश्न

महाराष्ट्रातील ईडीच्या कारवायांचा तपास लवकर लावण्याची केली मागणी
 Dr Neelam Gorhe
Dr Neelam GorheSarkarnama

सोलापूर : देशात अनेक राज्ये आहेत. ईडीची (ED) कारवाई मात्र सातत्याने महाराष्ट्रातच (Maharashtra) होत आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या राज्यांमध्ये ईडीने किती कारवाया केल्या? असा प्रश्‍न उपस्थित करत तपासाधिन असलेल्या विषयांवर अधिक भाष्य करणार नसल्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी आज सोलापुरात सांगितले. (How many ED operations in Madhya Pradesh, Himachal Pradesh : Dr Neelam Gorhe)

तुळजापूर येथून डॉ. गोऱ्हे या सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्यांवर, आमदार व खासदारांना ईडीच्या वतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईमध्ये शिवसेनेचे नेते वस्तुस्थिती सांगत आहेत. ईडीला सहकार्य करत आहेत. ईडीच्या कारवाईचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून यामध्ये काय वस्तुस्थिती आहे, हे त्यांनी सांगण्याची आवश्‍यकता आहे.

 Dr Neelam Gorhe
संजय राऊत दिल्लीला निघण्यापूर्वीच 'ईडी'ने आपला डाव साधला!

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरस्थिती येऊन गेली आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पाण्याची गळती होत आहे. मंदिराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने निधी दिला होता. परंतु मंदिर दुरुस्तीला परवानगी मिळत नाही. तुळजापूर देवस्थानचेही अनेक प्रश्‍न आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या शक्ती कायद्याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने पाठपुरावा आवश्‍यक आहे, अशा सर्व स्थिती महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने राज्य सरकार आवश्‍यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

 Dr Neelam Gorhe
संजय राऊतांना ईडीने अटक केलेली नाही : आमदार सुनील राऊतांनी दिली महत्वपूर्ण माहिती

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सामान्यांचा पाठींबा

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करून जनतेत मिळसत आहेत. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शिवसेनेची नवीन रचना ठरवत आहेत. पक्षप्रमुख ठाकरे यांना जनमानसातून प्रचंड सहानभुती व पाठींबा मिळत आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळेल असा विश्‍वासही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in