जनआशिर्वाद यात्रेत थरार; बंदुकींना भाजपचे झेंडे लावून गोळीबार

नेत्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दीही होत आहे.
Firing at BJPs Jan Ashirwad Rally In Karnataka
Firing at BJPs Jan Ashirwad Rally In Karnataka

बेंगलुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कॅबिनेट विस्तारात नव्याने मंत्री झालेल्या नेत्यांच्या जनआशिर्वाद यात्रांना देशात सुरूवात झाली आहे. या नेत्यांना मार्ग निश्चित करून देण्यात आले आहेत. नेत्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दीही होत आहे. पण एका मंत्र्याच्या यात्रेत भर रस्त्यातच बंदुकींमधून हवेत गोळीबार करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (Firing at BJPs Jan Ashirwad Rally In Karnataka)

हा प्रकार मंगळवारी कर्नाटकातील जनआशिर्वाद यात्रेदरम्यान घडला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार बंदुका जप्त करण्यात आल्या असून त्यापैकी दोन बंदुकांना परवाना असल्याचंही स्पष्ट झालं आहे. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाजपचे माजी मंत्री बाबाराव चिंचणसुर हे हातात बंदूक घेतल्याचे दिसत आहेत. केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांची यात्रेत हा प्रकार समोर आला आहे. 

खुबा हे बिदर मतदारसंघाचे खासदार आहे. त्यांची यात्रा यादगीरमध्ये आल्यानंतर मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी पक्षाचे झेंडे, फलक, फुलांची उधळण करण्यात आली. तर चौघे जण थेट बंदुका घेऊन या स्वागताला आले अन् त्यांनी हवेत गोळीबार केला. यावेळी बंदुकीला पक्षाचा झेंडाही लावण्यात आला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत चौघांना अटक केली. 

भाजपने देशभरातील 22 राज्यांमध्ये 39 केंदीय मंत्र्यांचा सहभाग असलेल्या जनआशिर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. भाजपने कर्नाटकमधील चार नेत्यांना मंत्रीपदाची संधी दिली आहे. त्यामध्ये सामाजिक न्यायमंत्री अनेकल नारायणस्वामी, कृषी राज्यमंत्री शोभा करंदलजे, पशुसंवर्धन राज्यमंत्री एल. मुरूगन आणि खुबा यांचा समावेश आहे. खुबा हे बिदर आणि यादगीरमधील यात्रेचे नेतृत्व करत होते. तर करंदलजे यांची यात्रा मंड्या, राजीव चंद्रशेखऱ यांची यात्रा हुबळी, तर नारायणस्वामी यांची यात्रा बेंगलुरूमधून सुरू झाली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातही केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॅा. भागवत कराड, डॅा. भारती पवार आणि कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राणे यांच्या यात्रेचा मात्र सर्वात मोठा आहे. प्रामुख्याने कोकणसह मुंबईवर त्यांचा अधिक जोर राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com