जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी करणारं जहाज अखेर चार महिन्यांनी मुक्कामी - ever given ship finally reaches rotterdam after four months-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी करणारं जहाज अखेर चार महिन्यांनी मुक्कामी

वृत्तसंस्था
शनिवार, 31 जुलै 2021

सुएझ कालव्यात एव्हर गिव्हन हे मालवाहू महाकाय जहाज अडकल्याने जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी झाली होती.

सुएझ : सुएझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन (Ever Given) हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर 29 मार्चला दुसरीकडे हलवण्यात यश आले होते. यामुळे जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली होती. परंतु, नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर या जहाजाची झालेली कोंडी आता सुटली आहे. हे जहाज तब्बल १२९ दिवसानंतर मुक्कामाच्या ठिकाणी रॉटरडॅम येथे पोचले आहे. 

एव्हर गिव्हन हे 2 लाख टनांचे महाकाय जहाज 23 मार्चला सुएझ कालव्यात अडकले होते. आठवडाभरानंतर म्हणजेच 29 मार्चला अथक प्रयत्नांनंतर हे जहाज अखेर बाहेर काढण्यात यश आले होते. या जहाजामुळे आशिया आणि युरोपकडे दररोज जाणाऱ्या तब्बल 9.6 अब्ज डॉलरच्या मालाची वाहतूक थांबली होती. याचबरोबर सुएझ कालवा बंद पडल्याने इजिप्तला दररोज सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलरचा फटका बसला होता. 

या नुकसानीमुळे  सुएझ कालवा प्राधिकरणाने हे जहाज रोखून धरले होते. हे जहाज जप्त करीत जहाजाच्या कंपनीकडे तब्बल 90 कोडी डॉलरची मागणी केली होती. कंपनीने ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने हे जहाज कालवा प्राधिकरणाने जप्त केले होते. दरम्यान, जहाजाची कंपनी शोई कायसेन कैशा, कालवा प्राधिकरण आणि विमा कंपनी यांच्यात यावर चर्चा होती. यातून तोडगा न निघाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर कालवा प्राधिकरण आणि जहाज कंपनीत तडजोड झाली आहे..    

हेही वाचा : 'मास्क'ची कारवाई पोलिसांच्या अंगाशी; 3 दिवसांत 3 पोलिसांवर हल्ला 

या जहाजावरील सर्व 25 कर्मचारी भारतीय होते. हे जहाज रॉटरडॅम येथे चार महिन्यानंतर पोचले आहे. या जहाजावरून माल उतरवला जात आहे. एव्हरगिव्हन जहाज पाहून हायसे वाटल्याचे रॉटरडॅम बंदराच्या संचालकांना म्हटले आहे. या जहाजातून माल उतरवण्याचे काम सुरू असून ते सोमवारपर्यंत या ठिकाणी थांबणार आहे. त्यानंतर हे जहाज फ्रान्सला रवाना होणार असून तेथे त्याची तपासणी होणार आहे. 

तीन आठवड्यापूर्वी हे जहाज ग्रेट बिटर लेकजवळ उभे होते. आर्थिक कारणास्तव तब्बल चार महिन्यांपर्यंत हे जहाज तेथेच थांबवण्यात आले होते. जहाजाची मालकी जपानी कंपनीकडे असून त्यांनी सुएझ कालवा प्रशासनाशी करार केला आहे. त्यानंतरच जहाजाला सोडण्यात आले. या करारात किती रकमेवर तडजोड झाली, हे मात्र समजू शकले नाही. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख