धक्कादायक : कोरोनाबाधित पित्याच्या चितेतच मुलीने मारली उडी

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात दर तासाला 157 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.
daughter jumps on funeral pyre of  COVID 19 positive father in rajasthan
daughter jumps on funeral pyre of COVID 19 positive father in rajasthan

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona)  रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात आता दर तासाला सुमारे 157 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. यातच कोरोनाबाधित (Covid-19) पित्याच्या चितेवर मुलीने उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे.  (daughter jumps on funeral pyre of  COVID 19 positive father in rajasthan)

बारमेरमध्ये दामोदरदास शारदा (वय 73) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्यावर आज  अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या 34 वर्षीय मुलीने पित्याच्या चितेतच उडी मारल्याचा प्रकार घडला. या मुलीला तातडीने चितेतून बाहेर काढण्यात आले परंतु, ती 70 टक्के भाजली आहे. तिला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी तातडीने नेण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिला उपचारासाठी जोधपूरला नेण्यास सांगितले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. 

दामोदरदास यांना तीन मुली आहेत. यातील सर्वांत लहान असलेल्या चंद्रा हिने चितेत उडी मारली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पित्याच्या अंत्यसंस्कारावेळी हजर राहण्याची भूमिका आधीच चंद्रा हिने घेतली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

देशात 24 तासांत 3 हजार 780 जणांचा मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 6 लाख 65 हजार 148 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 26 हजार 188 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 82 हजार 315 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 87 हजार 229 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.87 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82.03 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 69 लाख 51 हजार 731 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com