धक्कादायक : सुटी न मिळाल्याने कोरोनाबाधित बँक व्यवस्थापक ऑक्सिजन सिलिंडरसह ड्युटीवर!

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण सापडत आहेत. कमर्चारी कोरोनाबाधित झाल्याने अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे.
covid positive bank manager attended work with oxygen cylinder
covid positive bank manager attended work with oxygen cylinder

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण (Covid Patients) सापडत आहेत. कमर्चारी कोरोनाबाधित झाल्याने अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे. यातच बँकेने (Bank) सुटी न दिल्याने एक कोरोनाबाधित व्यवस्थापक (Manager) चक्क ऑक्सिजन सिलिंडरसह कामावर हजर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

ही घटना झारखंडमध्ये घडली आहे. झारखंडमील बोकारो येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत हा प्रकार समोर आला. अरविंद कुमार असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. कुमार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना सध्या कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे. कोरोनाबाधित असूनही वरिष्ठ त्यांना रजा मंजूर करीत नव्हते. यामुळे वैतागून अखेर ते ऑक्सिजन सिलिंडरसह बँकेत कामावर हजर झाले. कुमार यांना त्याच दिवशी बँकेने घरी पाठवले. 

व्यवस्थापक कुमार हे ऑक्सिजन सिलिंडरसह कामावर हजर झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कुमार हे त्यांच्या पत्नीचा आधार  घेऊन बँकेत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा ऑक्सिजन सिलिंडर घेऊन येताना दिसत आहे. यावरुन बँकेवर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे. 

केने हा सर्व प्रकार प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. थकित कर्जावरुन कुमार यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांनी हे नाटक केले आहे. कुमार यांच्या कुटुंबीयांनीच हा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर टाकला. आपल्याविरोधातील चौकशी बंद व्हावी, यासाठी त्यांनी हा प्रकार केला होता, असा दावा बँकेने केला आहे.  

देशात 24 तासांत 3 हजार 660 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख  86  हजार 364 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 660 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख 18 हजार 895 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 44 दिवसांत पहिल्यांदाच रोजची रुग्णसंख्या 2 लाखांच्या खाली आली आहे.  देशातील रुग्णसंख्या याआधी 25 मे रोजी 2 लाखांच्या खाली आली होती. असे असले तरी मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com