corona variant found in india named as kappa and delta by who
corona variant found in india named as kappa and delta by who

कोरोनाचं झालं बारसं; भारतात आढळलेले विषाणूचे प्रकार कप्पा अन् डेल्टा

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सर्वसामान्य लोकांना माहिती सांगताना सोपे जावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आता पाऊल उचलले आहे.

जीनिव्हा : कोरोना (Covid-19) विषाणूच्या संसर्गाबाबत सर्वसामान्य लोकांना माहिती सांगताना सोपे जावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता पाऊल उचलले आहे. विषाणूच्या प्रकाराच्या (Covid Variant) नावांमधील संभ्रम दूर करण्यासाठी डब्लूएचओने या विषाणूच्या विविध प्रकारांना ग्रीक बाराखडीचा वापर करून नावे दिली आहेत. त्यानुसार, भारतात सर्वप्रथम आढळलेल्या बी.१.६१७.१ या विषाणू प्रकाराला कप्पा (Kappa) आणि बी.१.६१७.२ या प्रकाराला डेल्टा (Delta) नाव दिले आहे. 

भारतात आढळलेल्या विषाणूला भारतीय प्रकार असे म्हटले जात होते. याबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली होती. डब्लूएचओच्या अहवालात या विषाणूला भारतीय प्रकार म्हटले नसल्याचे भारताने निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणू प्रकारांचे शास्त्रीय नाव न बदलता दैनंदिन वापरासाठी त्यांना नवीन नावे दिली आहेत. त्यानुसार भारतातील विषाणूंना कप्पा आणि डेल्टा अशी नावे मिळाली आहेत. विषाणू प्रकारांना दिलेली नावे सोपी असून, यामुळे देशांच्या नावावरून विषाणूंना ओळखले जाण्याचा अवमानास्पद वाटणारा प्रकारही टाळला जाईल, असे डब्लूएचओ सांगितले. 

डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार,  कोरोना विषाणूच्या प्रकारांची शास्त्रीय नावे बदलण्यात आलेली नाहीत. मात्र, अवमानास्पद आणि संभ्रम निर्माण करणारी नावे टाळण्यासाठी चर्चेत वापरासाठी नवी नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या नव्या नावांचा वापर सर्वच देशांनी करावा. अमेरिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकारांना एप्सिलॉन आणि आयोटा अशी नावे देण्यात आली आहेत. 

दरम्यान, कप्पा हे नाव म्हणजे ग्रीक बाराखडीतील दहावे अक्षर आहे. केरळमध्ये आहारात आढळणाऱ्या एका खाद्यपदार्थाचे नावही कप्पा आहे. मल्याळी लोकांचा कप्पा हा अत्यंत आवडता खाद्यपदार्थ आहे. केरळमध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटकही कप्पाचा आस्वाद घेतात. त्यामुळे विषाणूला कप्पा हे नाव दिले गेल्याने अनेक मल्याळी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. 

अशी असतील नावे 
बी.१.६१७.१ ( भारत) : कप्पा 
बी.१.६१७.२ (भारत) : डेल्टा 
बी.१.१.७ (ब्रिटन) : अल्फा 
बी.१.३५१ (दक्षिण आफ्रिका) : बिटा 
पी.१ (ब्राझील ) : गॅमा 
पी.२ (ब्राझील) : झिटा 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com