Narendra Modi News: काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदींची हुकुमशहा हिटलरशी तुलना; म्हणाले, ''हिटलरही आपल्या...''

Congress News : थोडेच दिवस पंतप्रधान मोदींची सत्ता राहिली आहे.
Pm Narendra Modi
Pm Narendra Modi Sarkarnama

Congress Leader Siddharamaiyya On Narendra Modi : काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर वारंवार बोचरी टीका करण्यात येत असते. काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी मोदी यांची तुलना थेट रावणाशी केली होती. आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका यावर्षी होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात केली आहे. आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत भाजपला डिवचलं आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील नवा वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Pm Narendra Modi
MNS : ...म्हणून राजकीय पक्ष काढणं शक्य झालं; राज ठाकरेंनी सांगितली पक्ष काढण्यामागची प्रेरणा

काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे उड्डपी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या कर्नाटकात येण्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही आहे. मात्र, येथे येऊन जर ते १०० वेळा भाजपा सत्तेत येणार असं म्हणत असतील, तर असं होणार नाही हे ठामपणे सांगू शकतो.

तसेच पंतप्रधान मोदींची (Pm Narendra Modi) थेट हिटलरशी तुलना करताना सिध्दरामय्या म्हणाले, हिटलरही आपल्या तोऱ्यात फिरत होता. मुसोलिनी आणि फ्रेंकोचं काय झालं? पंतप्रधान मोदी सुद्धा काही दिवस फिरतील. तसेच, थोडेच दिवस पंतप्रधान मोदींची सत्ता राहिली आहे.

Pm Narendra Modi
High Court : शिंदे-फडणवीस सरकारला दणका ; दीडशे कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती रद्द..

सिध्दरामय्या यांच्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना आजही पक्षाचं अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत. ते फक्त राहुल गांधींचं समर्थन करतात. खर्गे नाममात्र पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण, नरेंद्र मोदी हे लोकनियुक्त नेते आहेत. नियुक्त केलेले नाहीत. ते कोणत्या गांधी परिवारातून आलेले नाहीत असा टोमणा मारतानाच सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरबरोबर केली ही काँग्रेसची भूमिका आहे का? असा सवालही जोशी यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in