PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या सभेत घुसखोरी करणाऱ्या बनावट NSG जवानाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईत होते.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama

Mumbai News : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिरातून मुंबई पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. गुरुवारी (१९ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) नावाचे बनावट ओळखपत्र वापरून त्याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. रामेश्वर मिश्रा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईत होते. या दौऱ्यात त्यांनी जवळपास 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याचवेळी एक व्यक्ती एनएसजीचे बनावट ओळखपत्र दाखवून एमएमआरडीए मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Narendra Modi
Prafull Patel : यांनी काढले नाना पटोलेंचे ‘स्टॅंडर्ड’, महाविकास आघाडीत काय चाललंय?

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी रामेश्वर मिश्रा (३५) हा नवी मुंबईचा रहिवासी आहे. तो भारतीय लष्कराच्या गार्ड्स रेजिमेंटचा सैनिक असल्याचा दावा करत आहे. या प्रकरणी रामेश्वर मिश्रा व्हीव्हीआयपी विभागात जाण्याचा प्रयत्न का करत होता, याची आर्मी, आयबी, दिल्ली पोलीस आणि पीएम सुरक्षा अधिकारी अशा अनेक एजन्सी संशयिताच्या माहितीची चौकशी करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 4500 पोलीस तैनात करण्यात आली होती. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या चार प्लाटून आणि जलद कृती दलाचे दंगलविरोधी पथक त्यांच्या कार्यक्रमात तैनात करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या आगमनासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसर आणि आसपासचा परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला होता. याशिवाय काही रस्त्यांवर वाहनांची वाहतूकही बंद करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com