काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी भंगारवाला अन् त्याची संपत्ती 1 हजार 744 कोटींची!

विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून, काँग्रेसने युसूफ शरीफ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी भंगारवाला अन् त्याची संपत्ती 1 हजार 744 कोटींची!
Congress Sarkaranama

बंगळूर : विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीची धामधूम कर्नाटकात (Karnataka) सुरू आहे. बंगळूर शहर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी काँग्रेसने (Congress) युसूफ शरीफ (Yusf Sharif) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शरीफ यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली असून, ती ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शरीफ हे अब्जाधीश आहेत. ते सुरवातीला भंगार व्यावसायिक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आता त्यांची संपत्ती जाहीर केली असून, त्यांची एकूण मालमत्ता 1 हजार 744 कोटी रुपये आहे. शरीफ हे भंगारवाले या नावाने परिचित आहेत. परंतु, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षीय वर्तुळात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

Congress
परमबीरसिंहाची चौकशी करताहेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे

शरीफ यांच्याकडे स्थावर मालमत्ता 1 हजार 643 कोटी रुपये, जंगम मालमत्ता 97.98 रुपये आणि कर्ज 67.24 कोटी रुपयांचे आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीकडे स्थावर मालमत्ता 1.30 कोटी रुपये आणि जंगम मालमत्ता 98.96 लाख रुपये आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडे जंगम मालमत्ता 32.22 लाख रुपये आहे. इतर मालमत्ता त्यांच्या मुलांच्या नावावर आहे.

Congress
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना आणलं अडचणीत; उपोषणाची थेट धमकी

शरीफ हे मूळचे कोलार गोल्ड फिल्ड्स येथील आहेत. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले असून, ते सरकारी शाळेत झाले आहे. त्यांना दोन पत्नी आणि पाच मुले आहेत. त्यात एक मुलगी आणि पाच मुलांचा समावेश आहे. शरीफ यांच्याकडे 3 कोटी रुपयांच्या मोटारी आहेत. यात एक रोल्स रॉईस आणि दोन फॉर्च्युनर मोटारींचा समावेश आहे. अब्जाधीश उमेदवाराला काँग्रेसने अचानक विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in