CJI : धनंजय चंद्रचूड आजपासून नवे सरन्यायाधीश, अयोध्या वादासह 'हे' मोठे निर्णय त्यांनी दिले!

CJI : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात देशाचे 50 वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देणार आहेत.
Dhananjay Chandrachood
Dhananjay ChandrachoodSarkarnama

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड आज (बुधवार दि.9) सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देणार आहेत.

न्यायमूर्ती चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत अशा दोन वर्षांसाठी या पदावर असतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होतात. ते आताचे न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांचे स्थान घेतील. ललित यांनी 11 ऑक्टोबर रोजी त्यांचे पुढील उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची 17 ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.

Dhananjay Chandrachood
'EWS आरक्षण वैध होऊ शकते, तर मराठा आरक्षण का नाही!'

13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी झेप घेतली होती. ऐतिहासिक निकाल देणार्‍या अनेक घटनापीठांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत. यामध्ये अयोध्या जमीन वाद, आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, सबरीमाला प्रकरण, लष्करातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देणे, भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देणे आदींचा समावेश आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड हे 29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Dhananjay Chandrachood
महापालिका वॅार्डरचना आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

चंद्रचूड यांनी राजधानी दिल्ली सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स, दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी आणि हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसएमधून फॉरेन्सिक सायन्समध्ये एलएलएम आणि डॉक्टरेट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com