विरोधी पक्षनेते अडचणीत; अंगरक्षकाच्या संशयास्पद मृत्यूचा 'सीआयडी' लावणार छडा

सीआयडीने सोमवारी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
CID takes over the case of Suvendu Adhikaris bodyguards death
CID takes over the case of Suvendu Adhikaris bodyguards death

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) अन् भाजप (BJP) नेते सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने आमनेसामने येत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याने अजूनही बंगालमधील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच आता बंगाल सरकारने विरोधी पक्षनेते सुवेंदू सरकार यांच्या अंगरक्षकाच्या संशयास्पद मृत्यूची फाईल पुन्हा उघडली आहे. आता या मृत्यूची चौकशी थेट गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आली आहे. (CID takes over the case of Suvendu Adhikaris bodyguards death)

सीआयडीने सोमवारी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. त्यामुळे बंगालमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत. ते तृणमूलमध्ये असताना त्यांचे अंगरक्षक सुभब्रत चक्रवर्ती यांनी 2018 मध्ये स्वत:वरच गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आतापर्यंत राज्य पोलिसांकडून केला जात होता. 

चक्रवर्ती हे बंगालमधील सशस्त्र पोलिस दलात होते. सुवेंदू हे खासदार झाल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांमध्ये चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2015 मध्ये ते तृणमूल सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतरही चक्रवर्ती यांनी अंगरक्षक होते. ता. 13 ऑक्टोबर 2018 रोजी चक्रवर्ती यांनी पोलिस बराकमध्ये मृतदेह आढळला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यावेळी पोलिसांनी केला होता. 

या घटनेला अडीच वर्षे झाल्यानंतर आता पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चक्रवर्ती यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार आहे.' सुपर्णा चक्रवर्ती यांनी ता. 7 जुलै रोजी कांथी पोलिस ठाण्यात नव्याने तक्रार दाखल करत पतीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. तृणमूल काँग्रेसने थेट सुवेंदू यांना जबाबदार धरले आहे. तर भाजपच्या नेत्यांनी सरकारकडून हा राजकीय सूड उगवला जात असल्याचा आरोप केला आहे. तृणमूलमध्ये असताना सुवेंदू हे ममतांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ममतांवर जोरदार टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणूकीत ममतांनी सुवेंदू यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात सुवेंदू यशस्वी ठरले असले तरी ममतांनी पुन्हा सत्ता राखली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com