धक्कादायक : भारतात घुसत चीनकडून युवकाचं अपहरण; भाजप खासदारानंच दिला पुरावा

एक मित्र चीनी लष्कराच्या तावडीतून निसटल्यानंतर त्याने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
धक्कादायक : भारतात घुसत चीनकडून युवकाचं अपहरण; भाजप खासदारानंच दिला पुरावा
Miram TaronSarkarnama

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून भारताच्या हद्दीत चीनच्या (China) घुसखोरीवरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर (Modi Government) सातत्याने टीका केली जात आहे. पण केंद्र सरकारकडून अशी कोणत्याही प्रकारची घुसखोरी नसल्याच दावा केला जात आहे. त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चीनी लष्कराने अरूणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) भारताच्या हद्दीत घुसून एका भारतीय तरुणाचं अपहरण केलं आहे.

चीनने 2018 मध्ये भारताच्या सीमेवर 3 ते 4 किमोमीटर रस्ता तयार केला होता. तिथूनच तरूणांच अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. त्याचा एक मित्र चीनी लष्कराच्या तावडीतून निसटल्यानंतर त्याने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भाजपचे अरूणाचल प्रदेशमधील खासदार तापिर गाओ (Tapir Gao) यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. गाओ यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Miram Taron
बिपिन रावत यांचे बंधू निवडणुकीच्या मैदानात? घेतला मोठा निर्णय

ही घटना अपर सिंयांग जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. चीनी पीएलएने मंगळवारी जिदो गावांतील 17 वर्षीय मिराम तारोन याचे भारतीय (India) हद्दीतील लुंगटा जोर क्षेत्रातील बिशिंग गावातून अपहरण केले आहे. हा भाग अरूणाचल प्रदेशातील अपर सियांग जिल्ह्यातील आहे. त्याचे पीएलएच्या तावडीतून निसटले आणि अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या यंत्रणांनी त्याच्या सुटकेसाठी ताडीने पावले उचलावती, अशी विनंती दाओ यांनी केली आहे.

दाओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृह मंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मीन आणि भारतीय लष्कराला तरूणाच्या सुटकेसाठी आवाहन केले आहे. ही घटना 18 जानेवारी रोजी घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चीनमधील नागरी मंत्रालयाने अरूणाचलमधील 15 ठिकाणांची नावे बदल्याचे समोर आले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला होता. बीजिंगचे हे पाऊल सत्य बदलू शकत नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न भाग आहे, हेच सत्त आहे, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in