कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता कमी होणार - central government may decrease gap between two covishield doses | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता कमी होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमधील (Dose) अंतर वाढवले आहे. हे अंतर हे पुन्हा चार ते आठ आठवडे करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

लसीकरणासंबंधीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एन.के.अरोरा म्हणाले की,  कोव्हिशिल्डचा एकच डोस दिला आहे अथवा पूर्ण लसीकरण झाले आहे, अशा लोकांमध्ये लशीची परिणामकारकता तपासली जात आहे. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर  ४ ते ६ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय शास्त्रीय आधारावर घेण्यात आला होता. यावरून लसीकरण सल्लागार समितीच्या सदस्यांत मतभेद नव्हते

लसीकरण हे अतिशय महत्वाचे आहे. लशींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी नंतर दोन डोसमधील अंतर आणखी कमी करणे चांगले असल्याचे सांगितले आणि त्यामुळे ५ ते १० टक्के फायदा होत असेल तर त्यावेळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. आता घेतलेला निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याची अंमलबजावणी कायम ठेवली जाईन, असेही अरोरा यांनी सांगितले. 

हेही वाचा : ब्रिटनचं पाहून भारतानं कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं! 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख