Yediyurappa Farewell Speech: भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राजकीय संन्यास ; उद्या विधानसभेत शेवटचं भाषण..

BS Yediyurappa Latest news : लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी येदियुरप्पाशिवाय भाजपला दुसरा पर्याय नाही.
 BS Yediyurappa
BS YediyurappaSarkarnama

BS Yediyurappa News : चार वेळा मुख्यमंत्री असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुपप्पा यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. उद्या (शुक्रवारी) विधानसभेत ते शेवटचे भाषण देणार आहे. काल (बुधवारी) ते माध्यमांशी बोलताना भावुक झाले होते.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी मला दिलेल्या सन्मान मी आयुष्यभर विसरु शकणार नाही,' विधानसभेत शुक्रवारी माझा शेवटचा दिवस असेल, त्यानंतर मी येथे येऊ शकणार नाही, मला भाषण देता येणार नाही, असे सांगताना ते भावुक झाले.

येदियुपप्पा म्हणाले, "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत येणार आहे. भाजपला सत्तेत आणण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे. कर्नाटक (Karnataka Assembly Election 2023) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येदुरप्पा नाराज असल्याची चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. ते आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नसले तरी भाजपचे कर्नाटकामधील मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

 BS Yediyurappa
Politics : निधी वाटपावरुन भाजप-शिंदे गटात धूसफूस,मंत्री सावंतांविरोधात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

लिंगायत वोट बँकेसाठी येदियुरप्पाशिवाय दुसरा पर्याय नाही..

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेत येण्यासाठी लिंगायत वोट बँक महत्वाची आहे, त्यासाठी बीएस येदियुरप्पा यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होणार आहे.

नाराज येदियुरप्पा यांची नाराजी दूर करीत लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी येदियुरप्पाशिवाय भाजपला दुसरा पर्याय नाही,असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात त्यांची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती.

 BS Yediyurappa
Pune Police : पोलीस चालक भरती कौशल चाचणी ; पात्र ठरलेल्या ८७० उमेदवारांना..

नेतृत्व देण्यास काही नेते अनुउत्सुक

कर्नाटकात लिंगायत समाजाचे १७ ते १८ मतदार आहेत, ते पारंपारिक भाजपचे मतदार आहेत.त्यांचे मते निर्णायक ठरतात, तसेच कर्नाटकमध्ये वोक्कालिगा हा समुदयाची संख्या लिंगायत समाजाच्या खालोखाल आहे. १५ ते १८ टक्के त्यांची मते आहेत.

मैसूर परिसरात त्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणीही येदियुरप्पा यांचा मोठा प्रभाव आहे.पण कर्नाटक भाजपमध्ये अंतर्गत वादामुळे येदियुरप्पा यांच्याकडे येत्या निवडणुकीचे नेतृत्व देण्यास काही नेते उत्सुक नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

८० जागांवर अप्रत्यक्षपणे प्रभाव..

२००८ मध्ये कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यासाठी येदियुरप्पाचे मोठे योगदान आहे. कर्नाटकात भाजप सत्ता मिळवून देण्याचे श्रेय येदियुरप्पा यांना दिले जाते. शेतकरी कुटुंबातील येदियुरप्पा यांची शेतकऱ्यांचे नेते म्हणून अशीही ओळख आहे.

सक्रिय राजकारणापासून लांब राहणारे येदियुरप्पा हे किमान ४० जागांवर प्रत्यक्ष आणि सुमारे ८० जागांवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकू शकता, त्यांचा फायदा भाजप कसा घेणार, हे येत्या काही दिवसात समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com