धक्कादायक निर्णय : कोरोनानं रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेता येणार

संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाईकाकडे सोपवला जात नाही.
Bodies of those who died of COVID19 will be allowed to be taken home
Bodies of those who died of COVID19 will be allowed to be taken home

नवी दिल्ली : कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारसह देशभरातील राज्यांकडून युध्द पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पण यातच एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळं मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेण्याची परवानगी केरळ (Kerala) सरकारनं दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयाचं समर्थन करताना त्यांनी भावनांचे कारण पुढे केले आहे. (Bodies of those who died of COVID19 will be allowed to be taken home)

कोरोनापासून बचावासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांच्याकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोनामुळं रुग्णालयात तसेच घरी रुग्णाचा मृत्यू झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याच्याही स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला जात नाही. संबंधित रुग्णालय व स्थानिक प्रशासनामार्फतच अंत्यविधी केला जातो. केवळ स्मशानभूमीमध्ये काही नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. 

रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेण्याबाबतही विशेष काळजी घेतली जाते. संसर्ग टाळण्यासाठी ही दक्षता घेतली जात असताना केरळ सरकारनं मृतदेह घरी नेण्यासाठी परवानगी दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कुटूंबियांना एक तासासाठी मृतदेह घरी नेता यईल, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री पी. विजयन यांनीच दिली.  

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळं मृत्यू झालेल्या आपल्या जवळच्यांना नातेवाईक व कुटूंबियांना शेवटची आदरांजलीही वाहता येत नाही. यातून भावनिक निराशा निर्माण होते. यावर तोडगा म्हणून कोरोनाबाधित मृतदेह घरी नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मृतदेह एक तासांसाठी घरी ठेवता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियातून टीका सुरू झाली आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच हा निर्णय तिसऱ्या लाटेसाठी निमंत्रण देणारा ठरेल, अशी टीका नेटकऱ्यांकडून केली जात आहे. तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणीही काही जणांनी केली आहे. 

दरम्यान, केरळमध्ये मंगळवारी 13 हजार 550 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात दैनंदिन आकडेवारीमध्ये केरळमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मंगळवारी 104 जणांचा मृत्यूही झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा 13 हजार 093 वर पोहचला असून कोरोनाबाधितांची संख्या एक-दोन दिवसांतच 28 लाखांचा टप्पा पार करू शकते. राज्याचा पॅाझिटिव्हिटी रेट 11 टक्के आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com