बनावट गुणपत्रिकेवर पत्नीला सरपंच केलेले भाजप आमदार तुरूंगात

सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीची इयत्ता पाचवीची बनावट गुणपत्रिका तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
BJP MLA allegedly forging wifes marksheet to enable her to contest panchayat polls
BJP MLA allegedly forging wifes marksheet to enable her to contest panchayat polls

उदयपूर : अयोग्य कागदपत्रांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आमदार, खासदारकीची निवडणूक लढवणाऱ्यांना अनेकदा आपलं पद गमवावं लागलं आहे. पण राजस्थानातील भाजपच्या एका आमदाराने सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी पत्नीची बनावट गुणपत्रिकाच तयार केली. ही निवडणुकीत त्यांनी जिंकलीही पण त्यानंतर गुणपत्रिकेवर आक्षेप घेतला गेल्याने आमदारांना तुरूंगात जावे लागले आहे. (BJP MLA allegedly forging wifes marksheet to enable her to contest panchayat polls) 

राजस्थानातील सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा यांना सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीची इयत्ता पाचवीची बनावट गुणपत्रिका तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी पत्नीला उतरवले होते. 

पत्नी शांता देवी यांनी या निवडणुकीत विरोधक सुगना देवी यांचा पराभव केला होता. पण निवडणूक निकालानंतर सुगना देवी यांनी शांता देवी यांच्यावर बनावट गुणपत्रिकेचा आरोप केला. या आरोपांवर झालेल्या चौकशीनंतर शांता देवी यांची गुणपत्रिका बनावट असल्याचे सिध्द झाले. या प्रकरणात मीणा यांनाही आरोपी करण्यात आले. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळण्यात आली. 

त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांच्या आत सारडा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच तोपर्यंत अटक न करण्याबाबतही संरक्षण दिले. त्यानुसार अमृतलाल मीणा सोमवारी सहाडा येथील न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या वकिलांनी बराच वेळ जामीनासाठी प्रयत्न केले. पण सरकार पक्षाच्या वतीने त्याला जोरदार विरोध करण्यात आला. त्यामुळं न्यायालयानं मीणा यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

राजस्थानमध्ये शिक्षणाची अट

राज्यात भाजप सत्तेत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटासाठी इयत्ता आठवी आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी इयत्ता पाचवीची अट आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com