वसुंधरा राजेच आमच्या नेत्या! सकाळी इशारा देताच दुपारी भाजपमध्ये नरमाईचा सूर

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे भाजपच्या पोस्टरवरुन गायब झाल्या आहेत. यावरुन त्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला इशारा दिला होता.
bjp leader says vasundhara raje is popular leader in rajasthan
bjp leader says vasundhara raje is popular leader in rajasthan

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेसचे (Congress) सरकार कोसळण्याची वाट पाहत असलेल्या भाजपमधील (BJP) अंतर्गत कलह आता टोकाला पोचला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) भाजपच्या पोस्टरवरुन गायब झाल्या आहेत. मागील 20 वर्षांत प्रथमच भाजपच्या पोस्टरमध्ये राजे नाहीत. यावर अखेर राजेंनी मौन सोडून पक्ष नेतृत्वाला थेट इशारा दिला होता. यानंतर अखेर वेगाने चक्रे फिरली असून, भाजप नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. 

वसुंधरा राजे यांनी आज त्यांच्या झालावर मतदारसंघातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पोस्टर प्रकरणी मौन सोडलं. त्यांनी पक्ष नेतृत्वाला थेट इशारा दिला. त्या म्हणाल्या की, मला पोस्टरमध्ये दिसण्यापेक्षा लोकांच्या हृदयावर राज्य करायचे  आहे. माझे काम जनतेच्या स्मरणात राहायला हवे. पोस्टरमध्ये दिसून मला काही साध्य होणार नाही. जनतेचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्यापेक्षा माझ्यासाठी काहीही महत्वाचे नाही. 

यानंतर भाजपमध्ये वेगाने चक्रे फिरली. भाजप नेत्यांनी वसुंधरा राजे याच आमच्या नेत्या आहेत, असे म्हणण्यास सुरवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड म्हणाले की, पोस्टरचा मुद्दा आता संपला आहे. वसुंधरा राजे या आमच्या नेत्या आहेत. असल्या गोष्टींना त्या नगण्य मानतात. त्यामुळे या गोष्टींवर अशी चर्चा करण्याची कोणतीही आवश्यकता आहे. वसुंधरा राजे या जनतेच्या हृदयात राहतात, असे त्यांनीच सांगितले आहे. हे खोटे असते तर त्या दोन वेळा मुख्यमंत्री बनल्या नसत्या. राजस्थानच्या राजकारणात त्यांना कुणीही नाकारू शकत नाही. वसुंधरा राजे या नेत्या आहेत आणि राहतील. 

विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी असताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांकडून त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यात वसुंधरा राजे यांच्याशिवाय मुख्यमंत्रिपदासाठी लायक कोणताही नेता नाही, त्याच एकमात्र सर्वश्रेष्ठ नेत्या आहेत, अशी वक्तव्ये त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहेत. त्यामुळं पक्षात दोन गट पडले आहेत. याचाच फटका अखेर त्यांना बसल्याचे मानले जात आहे. 

वसुंधरा राजे याच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील असे वक्तव्य केल्याबद्दल त्यांचे निकटवर्ती व भाजपचे ज्येष्ठ नेते रोहिताश्व शर्मा यांच्यासह सहा जणांना प्रदेश कार्यालयाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये प्रदेश महामंत्री भजनलाल, प्रताप सिंह सिंघवी यांचाही समावेश आहे. राज्यात पहिल्यांदाच वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना अशाप्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती. दिल्लीतूनच तसे आदेश आले असून या नेत्यांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याची चर्चा होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com