अजितदादांच्या सीबीआय चौकशीचा चेंडू थेट अमितभाईंच्या कोर्टात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच पत्र लिहून अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
bjp leader chandrakant patil demands cbi inquiry of ajit pawar to amit shah
bjp leader chandrakant patil demands cbi inquiry of ajit pawar to amit shah

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करावी, असा प्रस्ताव भाजप (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना (Amit Shah) यांनाच पत्र लिहून दोघांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत पाटील यांनी अमित शहांना पत्र लिहिले आहे. यामुळे सीबीआय चौकशीचा चेंडू थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे.  यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काळात अजित पवार आणि अनिल परब यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

भाजपच्या मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव करण्यात आला होता. भाजपने अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केल्याचे हे निदर्शक होते. अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने आता जाणीवपूर्वक लावून धरली आहे. 

केंद्रीय तपास संस्था कशा छळ करतात, हे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना थेट लिहून कळविले आहे. अजित पवार यांच्यामागेही केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. अजित पवारांबद्दल असलेली भाजपची सहानुभूती संपल्याचे कार्यकारिणीच्या ठरावातून  स्पष्ट झाले आहे. भाजपसाठी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हेच मोठे लक्ष्य आहे. यात आता अजित पवारांचीही भर पडणार आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com