विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटे, वरपूडकर, पटेल यांची नावे आघाडीवर; 5 जुलैला घोषणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
sangram thopte and suresh warpudkar are in race for assembly speaker
sangram thopte and suresh warpudkar are in race for assembly speaker

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  हे पद काँग्रेसकडे असून, अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यात संग्राम थोपटे (Sangram Thopte), सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांच्यासह अमिन पटेल (Amin Patel) यांचेही नाव आघाडीवर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवीन अध्यक्षांचे नाव 5 जुलैलै जाहीर होईल, अशी घोषणा केली आहे. 

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष निवड या विधिमंडळ अधिवेशनात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा 5 जुलैला होईल. काँग्रेसमध्ये कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. मी मंत्रिपदाची मागणी केली नाही. पक्ष देईल ती जबादारी मी पार पाडत आहे आणि माझ्यावर कोणताही मंत्री  नाराज नाही. महाविकास आघाडी मध्ये कुठलीही नाराजी नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली असून, यात अधिवेशन आणि इतर विषयांवर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवे धोरण आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने 23 जूनला राज्यपालांची भेट घेतली होती. यात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. यावर राज्यपालांनी 24 जूनला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसमधून संग्राम थोपटे, सुरेश वरपूड आणि अमिन पटेल यांची नावे आघाडीवर आहेत. संग्राम थोपटे यांना सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिपद द्यायचं जवळपास निश्‍चित झालं होतं. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आता त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे आणि त्यांच्या समर्थकांनाही या वेळी त्यांची अध्यक्षपदासाठी निवड होईल, असा ठाम विश्‍वास आहे. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेले आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि ते प्रदेशाध्यक्ष बनले, तेव्हापासून अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे कायम आहे. हा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेसला तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत धुसफुस सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे. या निवडणुकीबाबत निर्णय घेताना तिन्ही पक्षांना याचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून यावर तोडगा काढतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com