भाजप नेतृत्वाचा येडियुरप्पांना मोठा धक्का...मुलाला मंत्रिपद नाहीच! - b s yediyurappa son b y vijayendra denied cabinet post in karnataka-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

भाजप नेतृत्वाचा येडियुरप्पांना मोठा धक्का...मुलाला मंत्रिपद नाहीच!

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा अखेर सुटला असला तरी येडियुरप्पांना भाजप नेतृत्वाने धक्का दिला आहे. 

नवी दिल्ली : कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा (Cabinet) तिढा सुटला असून, अखेर 29 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे शपथविधीच्या तासभर आधी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या (B. S. Yediyurappa) निवासस्थानी दाखल झाले होते. येडियुरप्पांच्या पुत्राचा मंत्रिमंडळात समावेश नसल्याचे कारण यामागे असल्याचे समजते. 

बोम्मई हे मंत्रिमंडळाच्या यादीला दिल्लीतून मंजुरी घेऊन राज्यात परतले. त्यानंतर आज दुपारी शपथविधी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शपथविधीच्या तासभर आधी ते येडियुरप्पांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी येडियुरप्पांशी काही काळ चर्चा केली. येडियुरप्पांनी नव्या मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, असे बोम्मई यानंतर बोलताना सांगितले. येडियुरप्पांनी पुत्राच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. परंतु, पक्ष नेतृत्वाने याला महत्व दिले नसल्याचे समोर आले आहे. 

येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नसल्याचे बोम्मई यांनी सांगितले. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना विजयेंद्र हे सुपरसीएम असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत होते. मुलामुळेच येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला, अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विजयेंद्र यांनी वगळून पक्ष नेतृत्वाने येडियुरप्पांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

याबद्दल बोम्मई म्हणाले की, मी केवळ सांगू शकतो की विजयेंद्र हे मंत्रिमंडळात नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येडियुरप्पांशी याबाबत चर्चा केली आहे. याचबरोबर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी खुद्द विजयेंद्र यांच्याशी चर्चा केली आहे. 

राजभवनात आज 29 मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवीन मंत्र्यांना शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. नव्या मंत्रिमंडळात जातीय समतोल साधण्यावर भर देण्यात आला आहे. मंत्रिमंडळात 6 ते 8 नवीन चेहरे आहेत. याचबरोबर येडियुरप्पांचे समर्थक आणि विरोधकांनी समसमान प्रमाणात स्थान देण्यात आले आहे.   

हेही वाचा : मला मंत्री नाय केलं तर राजीनामा! शपथविधीआधी राजीनामानाट्य 

येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख