मला मंत्री नाय केलं तर राजीनामा देणार! शपथविधीआधी नाराजीनाट्य

कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा तिढा अखेर सुटला असला तरी आता भाजपमधील इच्छुकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.
bjp mla anand mamani threatens to resign if not made minister
bjp mla anand mamani threatens to resign if not made minister

नवी दिल्ली : कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा (Cabinet) तिढा निर्माण झाल्यामुळे कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे दिल्लीत (Delhi) ठाण मांडून होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळाच्या यादीला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, शपथविधीआधी नाराजीनाट्य सुरू झाले असून, भाजप आमदारांनी राजीनाम्याचा उघड इशारा दिला आहे. 

आज दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी 29 मंत्र्यांच्या शपथविधी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत बोम्मई यांनी दिले आहेत. याबाबतची अधिसूचना राजभवनाने काढली आहे. राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे नवीन मंत्र्यांनी शपथ देतील. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार हे अद्याप जाहीर झालेले नसले तरी यावरुन नाराजीनाट्य सुरू झाले आहे. नवीन मंत्र्यांची अधिकृत जाहीर होण्याआधीच काही आमदारांनी उघडपणे पक्षाला इशारा दिला आहे. आमदार नेहरू ओलेकर यांच्या समर्थकांनी पक्षाला इशारा देत नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार आनंद मामनी हे येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना विधानसभेचे उपाध्यक्ष होते. मंत्री न बनवल्यास राजीनामा देण्याचा इशारा त्यांनीही दिला आहे. मागील आठवड्यात मामनी यांनी एक व्हिडीओ जाहीर केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी एक ज्येष्ठ आमदार आहे. मी मतदारसंघातील जनतेसाठी काम करीत आहे. मला मंत्री बनवले नाही तर उपसभापतिपदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला मला समर्थकांनी दिली. त्यांचा सल्ला मी मानेन. 

बोम्मई हे 1 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाले होते. ते मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले होते. त्यांनी कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांची भेट घेतली होती. बोम्मई यांनी 2 जुलैला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली होती. बोम्मई यांनी म्हटले होते की, मी मंत्रिमंडळाच्या 2 ते 3 याद्या पक्षाच्या अध्यक्षांकडे सादर केल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष अंतिम यादी तयार करतील. यानंत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांच्याशी चर्चा करुन मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख निश्चित होईल. 

येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जाते. बोम्मई हे आधीच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com