गणपती व बुद्धांची मूर्ती घेऊन आले अन् पुजापाठ करूनच मंत्र्यांनी पदभार स्वीकारला

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी त्यांच्याकडे आरोग्य खात्याचे राज्यमंत्री पद होते.
Ashwini kumar Chaube takes charge of State Minister
Ashwini kumar Chaube takes charge of State Minister

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 13 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली. या मेगाविस्तारातून आपले मंत्रिपद टिकवून ठेवण्यात काहींना यश आले. शपथविधीनंतर बहूतेकांनी पदभार स्वीकारला आहे. (Ashwini kumar Chaube takes charge of State Minister)

पर्यावरण, वने खात्याच्या राज्यमंत्र्यांनी सोमवारी (ता. 12) कार्यालयात गणपती व बुध्द मुर्ती आणून पूजापाठ करत मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतला. केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांना आपले मंत्रिपद राखण्यात यश मिळालं आहे. विस्तारापूर्वी त्यांच्याकडे आरोग्य खात्याचे राज्यमंत्री पद होते. डॅा. हर्ष वर्धन यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर चौबे यांच्या अन्य एका राज्यमंत्र्यांनाही पदावरून हटवण्यात आले. 

चौबे यांचेही मंत्रिपद जाणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, चौबे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यांना ग्राहक, खाद्यान्न आणि सार्वजनिक वितरण तसेच पर्यावरण, वन या खात्यांचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. चौबे यांनी अद्याप पदभार स्वीकारला नव्हता. अखेर सोमवारी त्यांनी विधिवत पूजा करून मंत्रालयाचे कामकाज हाती घेतले. त्यासाठी त्यांनी कार्यालयात गणपती व गौतम बुध्दांची मूर्ती आणली होती. कार्यालयात पूजपाठ करण्यात आला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर ते मंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाले. 
 
चौबे हे बिहारमधील बक्सर मतदारसंघाचे खासदार आहेत. ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. तासन् तास पूजा करण्यामुळे ते अनेकदा कार्यक्रमांना उशिरा दाखल होतात, असा स्थानिकांचा दावा आहे. बिहार सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी सतत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सुशीलकुमार मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळं त्यांना मंत्रिपद सोडावे लागेल, अशी चर्चा होती. पण त्यानंतरही त्यांचे पद टिकून राहिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक म्हणून चौबे यांच्याकडे पाहिले जाते. भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आल्यानंतर चौबे यांच्यासह गिरीराज सिंह यांनी त्याचे उघडपणे समर्थन केले होते. या काळात नितीश कुमार यांच्याकडून मोदींवर टीका केली जात होती. त्यामुळेच बिहारमधून चौबे यांना सातत्याने मंत्रिमंडळात संधी दिली जात असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com