काँग्रेसला लवकरच मोठा धक्का; शत्रुघ्न सिन्हा पक्षाला ठोकणार रामराम - Shatrughan Sinha likely to join Trinamool Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

काँग्रेसला लवकरच मोठा धक्का; शत्रुघ्न सिन्हा पक्षाला ठोकणार रामराम

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बडे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसणार आहे. बिहारी बाबू म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच पक्ष सोडणार असल्याचे समजते.  त्यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Shatrughan Sinha likely to join Trinamool Congress)

शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसच्या तिकिटावरुन पाटणा साहिब मतदारसंघातून 2029 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्याआधी 2009 आणि 2014 मध्ये सिन्हा हे भाजपकडून या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध करीत त्यांनी भाजप सोडली होती. भाजप हा 'वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी' बनला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा : विरोधी पक्षनेते अडचणीत; अंगरक्षकाच्या संशयास्पद मृत्यूचा सीआयडी लावणार छडा

आता सिन्हा काँग्रेसचा हातही सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेस सोडून ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. येत्या 21 जुलै रोजी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे समजते. तृणमूलकडून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी असल्याचे समजते. यशवंत सिन्हा यांनीही काही दिवसांपूर्वी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. 

एका वृतसंस्थेशी बोलताना सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर थेट उत्तर दिले नाही. मात्र, राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता  येत नाही, असं म्हणत त्यांनी ही चर्चा फेटाळूनही लावली नाही. तृणमूलमधील काही नेत्यांनीही सिन्हा यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केलं. त्यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिल्याचेही या नेत्यांनी सांगितलं. 

सिन्हा यांनी 80 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपचे दोन खासदार होते. त्याकाळात सिन्हा हे पक्षामध्ये स्टार प्रचारक म्हणून सक्रीय होते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात त्यांनी अनेक वर्ष हे काम केलं. पण मोदी व शहा यांच्याशी त्यांचे सुर जुळले नाहीत. त्यामुळे 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख