जेटली हे सर्वांत मोठे अपयश ते 'एनएम' अन् 'एएस' यांच्याकडून अर्थ मंत्रालयात बदल...

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
arnab goswami and partho dasgupata whats app chat reveals big secrets
arnab goswami and partho dasgupata whats app chat reveals big secrets

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. यातून गोस्वामी आणि भाजप सरकारमधील संबंध समोर आले आहेत. याचबरोबर गोस्वामी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबद्दल वादग्रस्त भागही समोर आला आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहे. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने अनेक वेळा उल्लेख केला आहे. 

या चॅटमध्ये जेटली यांच्याबद्दल वादग्रस्त उल्लेख आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन वर्षांना जेटली यांचा मागील वर्षी 24 ऑगस्टला मृत्यू झाला होता.जेटली हे अखेरच्या काळात रुग्णालयात दाखल असताना गोस्वामी यांनी या चॅटमध्ये जेटली आणखी किती दिवस लांबवताहेत, अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती. पंतप्रधान कार्यालयाला काय करावे हेच कळत नाही. पंतप्रधान बुधवारी फ्रान्सच्या दौऱ्यावर जात आहेत, असेही गोस्वामींनी म्हटले होते. 

एनएम/एएस यांनी दुसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्रालयात फेरबदल करायला हवेत. आपण काहीही म्हटलो तरी अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. जेटली हे सर्वांत मोठे अपयश आहेत, असे दासगुप्ता यांनी दुसऱ्या एका चॅटमध्ये म्हटले होते. यावर गोस्वामी यांनी मी अगदी तुमच्या मताशी सहमत आहे, असे म्हटले होते.    

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com