नायडू उपराष्ट्रपती होणार...बिनकामाचे प्रामाणिक जावडेकर ते स्मृती इराणींशी चांगली मैत्री..!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
arnab goswami said smriti irani is good friend in leaked whats app chat
arnab goswami said smriti irani is good friend in leaked whats app chat

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. या चॅटमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या अतिशय चांगल्या मित्र आहेत, असा उल्लेख गोस्वामींना केला आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅटमधून मुंबई पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. या चॅटमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या अतिशय चांगल्या मित्र आहेत, असा उल्लेख गोस्वामींना केला आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. 

तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती होणार याची माहिती गोस्वामींना आधीच असल्याचे या चॅटमधून समोर आले आहे. वेंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती होऊ शकतात, असे गोस्वामींनी 17 जुलै 2017 मध्ये म्हटले होते. त्याचदिवशी भाजपच्या संसदीय बैठकीत नायडू यांची उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली होती. 

या घडामोडीवर दासगुप्ता यांनी मंत्री बदलणार, असे म्हटले होते. आता माहिती व प्रसारण मंत्री कोण असेल, असा प्रश्नही त्यांनी केला होता. यावर, स्मृती इराणी या होतील. त्या लढवय्या आणि माझी त्यांच्याशी अतिशय चांगली मैत्री आहे, असे गोस्वामी म्हणाले होते. नायडू यांनी पदभार सोडल्यानंतर इराणींकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार आला होता. 

गोस्वामी यांनी 30 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईत जावडेकरांनी भेटत असल्याची माहिती दिली होती. यावर जावडेकर हे बिनकामाचे प्रामाणिक असून, त्यांचा सचिव त्यांच्यापेक्षा पुढचा आहे. ते कोणतीही भूमिका घेत नाहीत तसेच, कशाचीही अंमलबजावणी करीत नाहीत, असे दासगुप्ता म्हणाले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याची माहितीही आधीच गोस्वामींना असल्याचेही चॅटमधून समोर आले आहे. ही बातमी माझी ब्रेकिंग असेल, असेही त्यांनी म्हटले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com