Amritpal Singh Parents Reaction: अटकेनंतर अमृतपालच्या आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

वारिस पंजाब दे'संघटनेचा प्रमुख, खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला रविवारी सकाळीच पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली.
Amritpal Singh Parents Reaction
Amritpal Singh Parents ReactionTwitter@ANI

Amritpal Singh Parents Reaction:  'वारिस पंजाब दे'संघटनेचा प्रमुख, खलिस्तानी समर्थक  अमृतपाल सिंग (Amritpal Singh)  याला रविवारी सकाळीच पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली. खलिस्तान समर्थक अमृतपाल जवळपास 36 दिवसांपासून फरार होता. आज पहाटेच्या सुमारास त्याने आत्मसमर्पण केलं. (Amritpal's mother's first reaction after the arrest; said)

अमृतपालला अटक झाल्यानंतर त्याची आई बलविंदर कौर यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. '' अमृतपालने आत्मसमर्पण केल्याची बातमी आम्ही पाहिली, त्याने एका योद्ध्याप्रमाने शरणागती पत्करली आहे. पण आम्ही कायदेशीर मार्गाने लढाई लढू आणि लवकरच त्याची भेटही घेऊ. तर अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग यांनीदेखली, आपला मुलगा नशा, व्यसनाविरोधात लढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  अमृतपाल सिंग (Amritpal Singh) 

Amritpal Singh Parents Reaction
Amritpal Singh News : मुख्यमंत्री मान म्हणाले, " १८ मार्च रोजीच त्याला पकडले असते, ; पोलिसांनी गोळीबार..

अमृतपालने आत्मसमर्पण केल्याचे आम्हाला टीव्हीवरून कळले. पण शरणागतीची चर्चा असती तर इथेही करता आली असती, पण जे नाटक व्हायचं ते झालं. त्यांनी शीख म्हणून शरणागती पत्करली याचा आम्हाला अभिमान वाटतो. तो समाजासाठी काम करत असल्याने आम्ही खटला लढवू. तो ड्रग्जच्या विरोधात काम करत होता, लोकांना वाचवण्यासाठी काम करत होता. पण तरुणांनां नशेपासून वाचवणाऱ्यांचीच सरकार बदनामी करत आहेत. व्यसन मुक्तीचे काम करणाऱ्यांनाच सरकार संपवत असल्याचा आरोप अमृतपालच्या वडीलांनी केला आहे.  (Panjab news)

अमृतपालला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) आसाममधील दिब्रुगड येथे नेण्यात आले आहे. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध समाजात शत्रुत्व निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि लोकसेवकांच्या कामात अडथळा निर्माण करणे, यासंबंधी अनेक गुन्हे दाखल आहेत. अमृतपाल सिंग यापूर्वी दोनदा पोलिसांना चकवा देत फरार झाला होता.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com