Amritpal Singh news : अमृतपाल सिंगच्या समर्थनार्थ घोषणाबाजी: खलिस्तानी समर्थकांकडून तिरंग्याचा अपमान

अमृतपालचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.
Amritpal Singh news :
Amritpal Singh news :

Amritpal Singh Arrest Operation : खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आल्याचा दावा पंजाब दे वारीस या संघटनेच्या वकीलाकडून करण्यात आला आहे. याचे पडसाद आता ब्रिटनमध्ये उमटू लागले आहेत.अमृतपाल सिंगच्या कारवाईविरोधात ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांकडून आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Slogans in support of Amritpal Singh: Insult of Indian national flag by Khalistani supporters)

धक्कादायक म्हणजे आंदोलक खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमानही केला.एएनआय वृत्तसंस्थेने या आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करताना काही खलिस्तानी समर्थकांनी अमृतपाल सिंगच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्याचवेळी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावरील भारतीय राष्ट्रध्वज खाली उतरवून तिरंग्याचा अपमान केला. या घटनेमुळे मात्र भारतातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Amritpal Singh news :
Amritpal Singh : अमृतपाल सिंग याला अटक ? ; गाडी चालक, काकाचे आत्मसमर्थन

दरम्यान, अमृतपाल सिंगला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे. अमृतपालचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे.शनिवारी (18 मार्च) पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या अनेक समर्थकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली. शनिवारी मध्यरात्री अमृतपालचे काका आणि त्याच्या ड्रायव्हरने स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाल्याचं वृत्त आहे. दोघेही अमृतपालच्या मर्सिडीज कारमध्ये आले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

18 मार्चपासून सुरू झालेली पंजाब पोलिसांची कारवाई 19 मार्चलाही सुरू होती. त्याचबरोबर पोलिसांनी आतापर्यंत 112 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी 7 अवैध शस्त्रे, 300 हून अधिक गोळ्या, 3 वाहने जप्त केली आहेत. यासोबतच काही फोनही जप्त करण्यात आले असून ते तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे पाकिस्तान-आयएसआयशी असलेले संबंधही समोर आले आहेत.

पंजाबमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अमृतपाल सिंगचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलसीच्या फोनमध्ये आणि त्याच्याशी संबंधित असलेले पाकिस्तानी नंबर सापडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com