तालिबाननं कब्जा करताच अगाणिस्तानातील अमेरिकेचं अस्तित्व संपुष्टात

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा करत अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवल्याचा जाहीर केलं.
America exits from Afghanistan after 20 years
America exits from Afghanistan after 20 years

काबूल : अफगाणिस्तानातील दहशतवादाविरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याला 20 वर्ष पूर्ण झाली अन् सैन्यानं काढता पाय घेतला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पंधरा दिवसांतच अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने सोमवारी रात्री काबूल विमानतळावरून उड्डाण केले. मेजर जनरल ख्रिस डोनाहू अफगाणातून बाहेर पडणारे शेवटचे अमेरिकन ठरले. (America exits from Afghanistan after 20 years)

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा करत अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवल्याचा जाहीर केलं. त्यानंतर अमेरिकेला आपलं सैन्य 31 ऑगस्टपर्यंत बाहेर काढण्यास सांगितले. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर बहुतेक देशांनी आपले अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांना मायदेशी हलवण्यास सुरूवात केली. यामध्ये अनेक अफगाण नागरिकांनीही देश सोडला. 

अमेरिकेसमोरच बाहेर पडण्याचे सर्वात मोठं आव्हान होतं. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीदरम्यानच अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी काही महिन्यांपासून या प्रक्रियेला सुरूवातही केली. वीस वर्षांपूर्वी तालिबानची सत्ता उलटवून लावत अमेरिकेनं अफगाणिस्तावर ताबा मिळवत लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडूण आलेल्या सरकारचा संपूर्ण संरक्षण दिलं होतं. 

अमेरिकेने बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काही महिन्यांपासून एक-एक प्रांत काबीज करत तालिबानने अखेर 15 ऑगस्ट रोजी काबूलमध्ये धडक दिली. त्यानंतर अमेरिकेने आपली बाहेर पडण्याच्या मोहिमेला वेग दिला होता. मंगळवारी पहाटे अमेरिकेच्या शेवटच्या सैन्यानं अफगाणची भूमी सोडली अन् अमेरिकेचे अफगाणिस्तानातील वीस वर्षांचे वास्तव्य संपुष्टात आले. 

अमेरिकेच्या या मोहिमेचा शेवट चांगला झाला नाही. या मोहिमेदरम्यान मागील आठवड्यात काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात अमेरिकेचे 13 सैन्य मारले गेले. हा बायडन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बायडन यांनी याची गंभीरपणे दखल घेत बदला घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच इसिसच्या दहशतवादी असलेल्या ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. त्यामध्ये हा दहशतवादी मारला गेल्याचा दावा अमेरिकेने केला असला तरी काही नागरिकांचाही मृत्यू झाल्याने त्यावरून वादाला तोंड फुटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com