शशिकलांचं असंही स्वागत : पाऊल घरात पडण्याआधीच नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच

शशिकला या चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. त्यांचे कार्यकर्त्यांना जंगी स्वागत केले असले तरी सरकारने मात्र, वेगळ्या पद्धतीने स्वागत केले आहे.
aiadmk government confiscated  properties of v k sasikala relatives
aiadmk government confiscated properties of v k sasikala relatives

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या आज चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या. कर्नाटक सीमेवर समर्थकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, त्यांचे घरात पाऊल पडण्याआधीच राज्यातील अण्णाद्रमुक सरकारने त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच आणण्यास सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात शशिकला विरुद्ध अण्णाद्रमुक असा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. 

आज सकाळी जयललिता यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून शशिकला बंगळूरमधून निघाल्या. अण्णाद्रमुकने विरोध करुनही त्यांनी पक्षाचा ध्वज मोटारीवर लावला होता. त्यांच्या समर्थकांनीही हातात पक्षाचे झेंडे घेतले होते. सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांनी तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचे स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. कर्नाटक सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या. 

शशिकलांच्या आगमनाने राज्यातील राज्यातील राजकारण तापले आहे. दक्षिणेतील सुडाचे राजकारण या निमित्ताने पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त आहे. शशिकलांचे घरात पाऊल पडण्याआधीच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच आणण्यास सत्ताधारी अण्णाद्रमुकने सुरवात केली आहे. त्यांच्या अशा पद्धतीने सरकारने स्वागत केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

शशिकलांची भावजय जे.इलावरसी आणि जयललितांचा दत्तकपुत्र व्ही.एन.सुधाकरन यांच्या चेन्नईतील दोन मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सुधाकरन हाही शशिकला यांचा नातेवाईक आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात इलावरसी आणि सुधाकरन यांनाही शशिकलांसोबत शिक्षा झाली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तिघांनाही दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावूनत्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला होता. आता इलावरसी आणि सुधाकरन यांची वॉलेस गार्डनमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या बंगळूरमध्ये विश्रांती घेत होत्या.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com