धक्कादायक : अफगाणिस्तानचा नवीन उपपंतप्रधान मुल्ला बरादर गायब

कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारा बरादर हा काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनातून गायब झाला आहे.
धक्कादायक : अफगाणिस्तानचा नवीन उपपंतप्रधान मुल्ला बरादर गायब
afghanistan deputy prime minister mullah baradar is missing

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानकडून (Taliban) नव्या सरकारची घोषणा करण्यात आली असून मोहम्मद हसन अखुंद हा सरकारचं नेतृत्व करणार आहे. हसन हा देशाचा पंतप्रधान असेल तर मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Baradar) याच्याकडे उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. परंतु, कायम प्रसिद्धीच्या झोतात दिसणारा बरादर हा काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनातून गायब झाला आहे. तो मारला गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

तालिबानने नुकतेच मंत्रिमंडळ जाहीर केले. हे मंत्रिमंडळ अंतरिम असून त्यामध्ये आणखी काही मंत्र्यांच्या नावे समाविष्ट केली जाणार आहेत. पंतप्रधानपद मिळालेला हसन हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा सहकारी आहे. तो सध्या तालिबानच्या तालिबानमध्ये महत्वाचे निर्णय घेणाऱ्या परिषदेचा प्रमुख आहे. त्याचं नाव संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही असल्याचं वृत्त आहे. याचबरोबर मुल्ला बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपद देण्यात आले. 

बरादर हा काही दिवसांपासून गायब झाला आहे. यामुळे त्याच्या गायब होण्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. बरादरचा मृत्यू अथवा तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय निवासात तालिबानच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादात गोळीबार झाला होता. यातच बरादरचा मृत्यू अथवा तो गंभीर जखमी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रमुख असलेला बरादर सरकारचं नेतृत्व करेल, अशी काही दिवसांपपर्यंत चर्चा होती. त्याला उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. तोही तालिबानचा सहसंस्थापक आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या हक्कानी नेटवर्कचा संस्थापकाचा मुलगा असलेला सराजुद्दीन हक्कानी यालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्याकडं देशांतर्गत बाबींचे मंत्रिपद आलं आहे. 

त्याचप्रमाणे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रीपदी अमीर खान मुत्ताकी, उपपरराष्ट्र मंत्री अब्बास स्टॅनिकझाई, संरक्षण मंत्री मुल्ला याकूब यांचाही समावेश करण्यात आला आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद हा माहिती मंत्रालयाचा उपमंत्री असेल. या मंत्रिमंडळामध्ये तालिबानमधील नेत्यांचाच समावेश आहे. पूर्वीच्या अफगाण सरकारमधील नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान, सध्या तालिबानचा सर्वोच्च नेता असलेल्या मुल्ला हबितुल्ला अखुंजादा यानेच अखुंद याचं नाव पुढे केल्याचं वृत्त आहे. अखुंजादा याचं सरकारवर नियंत्रण राहणार आहे. अखुंद याच्याकडं पंतप्रधान पद असलं तरी अखुंजादाच्या हस्तक्षेपाशिवाय महत्वाचे निर्णय घेतले जाणार नाहीत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in