अफगाणिस्तानची सत्ता हाती मिळताच तालिबानी आपापसांत लागले भांडू

सत्ता हाती मिळताच तालिबानमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. यावरुन अध्यक्षीय प्रासादात दोन गटांमध्ये गोळीबारही झाल्याचे वृत्त आहे.
major fight broke between two groups of taliban
major fight broke between two groups of taliban

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानकडून (Taliban) नव्या सरकारची घोषणा करण्यात आली असून मोहम्मद हसन अखुंद हा सरकारचं नेतृत्व करणार आहे. हसन हा देशाचा पंतप्रधान असेल तर मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. परंतु, सत्ता हाती मिळताच तालिबानमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. यावरुन अध्यक्षीय प्रासादात दोन गटांमध्ये गोळीबारही झाल्याचे वृत्त आहे. 

अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय प्रासादात तालिबानचे दोन गट आमनेसामने आले. यावेळी गोळीबारही झाला असून, काही जण जखमी झाल्याचे समजते. यानंतर उपपंतप्रधान बरादर आणि मंत्री खलिल उर-रहमान हक्कानी यांच्यात शाब्दिक वाद झाला. हक्कानी हा हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या आहे. अफगाणिस्तानमधील विजयाचे श्रेय कुणाचे यावरून हा वाद झाला होता. बरादर याने हा विजय राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून मिळवल्याचा दावा केला आहे. तर हक्कानी याने हा विजय लढाईतून मिळाल्याचे म्हटले आहे. 

तालिबानने नुकतेच मंत्रिमंडळ जाहीर केले. हे मंत्रिमंडळ अंतरिम असून त्यामध्ये आणखी काही मंत्र्यांच्या नावे समाविष्ट केली जाणार आहेत. पंतप्रधानपद मिळालेला हसन हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा सहकारी आहे. तो सध्या तालिबानच्या तालिबानमध्ये महत्वाचे निर्णय घेणाऱ्या परिषदेचा प्रमुख आहे. त्याचं नाव संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही असल्याचं वृत्त आहे. याचबरोबर मुल्ला बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपद देण्यात आले. 

तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रमुख असलेला बरादर सरकारचं नेतृत्व करेल, अशी काही दिवसांपपर्यंत चर्चा होती. त्याला उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. तोही तालिबानचा सहसंस्थापक आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या हक्कानी नेटवर्कचा संस्थापकाचा मुलगा असलेला सराजुद्दीन हक्कानी यालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्याकडं देशांतर्गत बाबींचे मंत्रिपद आलं आहे. 

त्याचप्रमाणे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रीपदी अमीर खान मुत्ताकी, उपपरराष्ट्र मंत्री अब्बास स्टॅनिकझाई, संरक्षण मंत्री मुल्ला याकूब यांचाही समावेश करण्यात आला आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद हा माहिती मंत्रालयाचा उपमंत्री असेल. या मंत्रिमंडळामध्ये तालिबानमधील नेत्यांचाच समावेश आहे. पूर्वीच्या अफगाण सरकारमधील नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान, सध्या तालिबानचा सर्वोच्च नेता असलेल्या मुल्ला हबितुल्ला अखुंजादा यानेच मुल्ला हसन याचं नाव पुढे केल्याचं वृत्त आहे. अखुंजादा याचं सरकारवर नियंत्रण राहणार आहे. हसन याच्याकडं पंतप्रधान पद असलं तरी अखुंजादाच्या हस्तक्षेपाशिवाय महत्वाचे निर्णय घेतले जाणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com