नवज्योतसिंग सिद्धू यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
AAP has always recognised my vision & work for Punjab says Navjotsingh Sidhu
AAP has always recognised my vision & work for Punjab says Navjotsingh Sidhu

चंदीगड : पंजाब (Punjab)  काँगेसमधील  (Congress) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याविरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh  Sidhu) यांनी आघाडी उघडली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यातच सिध्दू यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्विटमुळं पुन्हा एका खळबळ उडाली आहे. (AAP has always recognised my vision & work for Punjab says Navjotsingh Sidhu)

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सिध्दू कधीही आपमध्ये जाऊ शकतात, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यातच सिध्दू यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटमुळं चर्चेला उधाण आले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपचे कौतुक केले आहे. 'विरोधी पक्ष असलेल्या आपने नेहमीच पंजाबसाठीचे माझे व्हिजन आणि कामाला ओळखलं आहे. 2017 च्या आधी असो किंवा आता मी पंजाब मॉडेलविषयी बोलत असतो. वास्तवात पंजाबसाठी कोण लढत आहे, हे लोकांना माहित आहे,' असं सिद्धू यांनी म्हटलं आहे. 

आम आदमी पक्षाचे खासदार आणि पंजाबचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांना ट्विटरवरून उत्तर देताना सिद्धू यांनी थेट आपचे कौतुक केलं आहे. थर्मल प्रकल्पाद्वारे काँग्रेसला निधी देण्याच्या मुद्यावर सिद्धू गप्प का आहेत, असा सवाल मान यांनी उपस्थित केला होता. त्यावर सिद्धू यांनी हे उत्तर दिलं. पण हे उत्तर देताना सिद्धू यांनी आपचे कौतुक केल्याने राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.   

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सिद्धू हे आपमध्ये जाणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सिद्धू यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत हे सिद्ध करण्याचे खुले आवाहन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर इतर नेते व मंत्रीही नाराज आहेत. सिद्धू यांच्यासह नाराज मंत्री, आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना नुकतेच दिल्लीत बोलावण्यात आले होते. 

तसेच, काँग्रेस नेतृत्वाकडून हरीश रावत यांच्यासह तीन जणांची समितीही तयार करण्यात आली आहे. या समितीने सिध्दू, काँग्रेस नेते परगतसिंग आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती. तसेच, मुख्यमंत्र्यांनीही या समितीसमोर म्हणणे मांडले होते. निवडणूकीआधी काँग्रेसमधील कलह कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या समितीसमोर दोनदा अमरिंदरसिंग हजर झाले होते. तसेच, सिद्धूही दोनदा या समितीला भेटले आहेत. अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न ही समिती करीत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com