शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओमराजे आक्रमक; संसदेत शिवसेना-सरकारमध्ये जुंपली..

महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे एनडीआरएफतंर्गत ३७२१ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मागितले होते, असे असताना केवळ ७०१ कोटीच रुपये का दिले.
Loksabha Seesion- Mp Omprakash Raje Nimabalkar News Dehli
Loksabha Seesion- Mp Omprakash Raje Nimabalkar News Dehli

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मागील वर्षी (ऑक्टोबर २०२०) पावसामुळे झालेल्या हानीपोटी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवरून आज लोकसभेमध्ये शिवसेना आणि सरकारमध्ये जुंपली.  केंद्राने महाराष्ट्राला ७०१ कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला. (With the help of farmers, Shiv Sena-Government clash in Parliament.) तर महाराष्ट्राची मागणी ३७२१ कोटी रुपयांची असताना ही मदत तुटपुंजी असून अद्याप राज्यापर्यंत ती का पोहोचली नाही, असा शिवसेनेचा सवाल होता.

लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेना खासदार ओम राजे निंबाळकर यांनी मराठवाड्यामध्ये मागील वर्षी १४-१५ ऑक्टोबर २०२० ला पावसामुळे झालेल्या हानीचा मुद्दा उपस्थित केला. (Shivsena Mp Omraje nimbalkar, Osmanabad) या प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी महाराष्ट्राला एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी) अंतर्गत ७०१ कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.

यावरील पुरवणी प्रश्नात कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी या मदतीच्या रकमेचा पुनरुच्चार केला. मात्र, खासदार निंबाळकर यांचे समाधान झाले नाही. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे एनडीआरएफतंर्गत ३७२१ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मागितले होते, असे असताना केवळ ७०१ कोटीच रुपये का दिले, असा सवाल निंबाळकर यांचा होता. एवढेच नव्हे तर ही रक्कमही अद्याप राज्य सरकारला मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला.

कृषीमंत्री तोमर यांनी अखेर यात हस्तक्षेप करताना या मदतीसाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे अंगुलिनिर्देश केला. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीची स्वतंत्र प्रक्रिया आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे तसेच राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) आणि केंद्रीय आपत्तीनिवारण निधीद्वारे (एनडीआरएफ) मदत केली जाते.

समितीच्या शिफारशीनंतर ७०१ कोटी 

महाराष्ट्रातील आपत्तीनंतर शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळाला. तसेच महाराष्ट्र सरकारच्या निवेदनानंतर केंद्र सरकारने नेमलेल्या अंतर मंत्रालयीन समितीने पाहणी केली. या समितीच्या शिफारशीनंतर गृह मंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी ७०१ कोटी रुपये मंजूर केल्याचे तोमर म्हणाले.  २०२०-२१ च्या खरीप आणि रब्बी हंगामात महाराष्ट्रात ११.४३ लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेद्वारे ७५० कोटी रुपयांचा फायदा झाल्याचाही दावा कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी यावेळी केला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com