शिवसेना आमदाराने पुरग्रस्तांसाठी पाठवले पाच हजार किट..

रोग्य यंत्रणेला मदत व्हावीयासाठी तज्ञ डॉक्टर, परिचारिकांचे दोन पथक कोकणात पाठविणार असल्याचेपाटील यांनी सांगितले.
Parbhani Shivsena Mla Rahul Paitl News
Parbhani Shivsena Mla Rahul Paitl News

परभणी ः राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूल पाटील यांनी पाच हजार अन्नधान्य व नित्योपयोगी वस्तूंच्या किट, जनावरांसाठी चारा कोकण व पश्चिम महाराष्ट्राकडे पाठवला. (Shiv Sena MLA sent five thousand kits for flood victims.) या किट घेवून जाणाऱ्या गाड्यांना बुधवारी (ता.२७) सांयकाळी भगवा झेंडा दाखवून परभणीतून रवाना करण्यात आले.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पुराचा फटका बसला आहे. या भागात अतोनात नुकसान झाले आहे. (Shivsena Mla Rahul Patil, Parbhani) राज्यभरातून या पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. परभणी आमदार पाटील यांनी पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांनी हा उपक्रम राबवला.

बुधवारी (ता.२७) या सर्व किट दोन बस गाड्यामध्ये भरून कोकणच्या दिशेने रवाना झाल्या. गुरुवारी (ता.२८) आणखी दोन बसगाड्या भरून किट पाठविल्या जाणार आहेत. परभणी महापालिकेचे आयुक्त देविदासराव पवार यांच्या हस्ते या गाड्यांना  झेंडा दाखवण्यात आला.

कोकणातील परिस्थिती पाहता त्या ठिकाणच्या आरोग्य यंत्रणेला मदत व्हावी यासाठी तज्ञ डॉक्टर, परिचारिकांचे दोन पथक कोकणात पाठविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर पुरग्रस्तभागातील जनावारांसाठी दोन ट्रकभरून चारा देखील पाठविला जाणार आहे.

कोरोना टाळेबंदीतही मदत

कोरोना विषाणु संसर्गाच्या पहिल्या लाटेत सलग तीन महिने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. त्यावेळी अनेक लोकांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळीही राहूल पाटील यांनी पुढाकार घेत संपूर्ण विधानसभा मतदार संघातील प्रत्येक घरात ताजा भाजीपाला मोफत पोहचविण्याचे काम केले होते.

यावेळी आमदार डॉ.राहूल पाटील, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, राजू कापसे, अरविंद देशमुख, रविंद्र पतंगे, अनिल डहाळे, संदीप भंडारी, संजय गाडगे, नवनित पाचपोर, गजानन काकडे, विशू डहाळे, संभानाथ काळे आदींची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com