अशोक चव्हाण म्हणाले, ‘सलीम’ आणि ‘देवदास’ कायम स्मरणात राहतील !

त्यांचे संवाद वास्तविक आयुष्याशी जवळीक साधणारे असायचे. त्यामुळेच त्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले.
Dilip Kumar
Dilip Kumar

मुंबई : अभिनेते दिलीप कुमार Actor Dilip Kumar यांच्या निधनाने पाच दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टी गाजवणारा महानायक काळाच्या पडद्याआड गेला. आपल्या अभिनय सामर्थ्याने त्यांनी विविध व्यक्तिरेखा अजरामर केल्या. प्रेमासाठी सर्वशक्तीमान राजवटीविरुद्ध बंड पुकारणाऱ्या ‘सलीम’पासून ते दारूत स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘देवदास’पर्यंतच्या त्यांच्या अनेक भूमिका कायम स्मरणात राहतील, From ‘Salim’ to ‘Devdas’ who ruined his own life with alcohol असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी म्हटले आहे. 

दिलीप कुमार यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, त्यांचा अभिनय आणि संवाद प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे होते. 'जो लोग सच्चाई की तरफदारी की कसम कहते हैं, ज़िन्दगी उनके बड़े कठिन इम्तिहान लेती है' सारखे त्यांचे संवाद वास्तविक आयुष्याशी जवळीक साधणारे असायचे. त्यामुळेच त्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. आमचे वडील डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याशी दिलीप कुमार यांचे निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने आपण एक महान अभिनेता गमावला आहे, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी दिवंगत अभिनेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

ट्रॅजेडी किंग व ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी आज सकाळी मुंबईत हिंदूजा रुग्णालयात निधन झाले. हे दिलीप कुमार अर्थात युसूफ भाई यांचे कुटुंब मुळचे देवळाली लष्करी कॅन्टोनमेंट येथील रहिवासी आहे. त्यांच्या आई आयेशा बेगम आणि वडील लाला गुलाम सरवर खान यांचे ते सुपुत्र होते. त्यांचा जन्म १९२२ मध्ये पेशावर येथे झाला. १९३६ च्या सुमारास ते देवळालीला स्थलांतरित झाले. १९४४ मध्ये दिलीप कुमार यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देवळाली परिसरात झालेले आहे. त्यात `गंगा जमुना` हा प्रमुख चित्रपट आहे.    

दिलीप कुमार यांचे कुटुंब फाळणीपूर्वीच भारतात आले व देवळालीला स्थायिक झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी सामरिक सोयीसाठी अफगाणिस्तान- पाकिस्तानच्या सीमेवरील क्वेट्टा येथील आपले तोफखाना केंद्र (सध्याचे स्कूल ऑफ आर्टीलरी) देवळालीला हलवले. आल्हाददायक थंड हवेचे ठिकाण, जंगल व डोंगर यामुळे तोफखान्याचे प्रशिक्षण व सरावासाठी हे गाव त्यांना सोयीचे वाटले. तोफखाना केंद्रामुळे लष्कराचे कॅन्टोनमेंट (छावणी) आली. त्यात लष्कराशी संबंधित अनेक व्यावसायिक आले. त्यात हे खान कुटुंब होते. बालपणी दिलीपकुमार कुंटुबाच्या लष्करी अधिकाऱ्यांना फळे विक्रीच्या व्यवसायात मदत करीत असत.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com