ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन  - veteran actor dilipkumar dies at hinduja hospital  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

दिलीप कुमार यांनी १९४०- १९७० अशी तीन दशकं चित्रपटक्षेत्रावर अधिराज्य गाजविलं.

मुंबई : ट्रॅजेडी   किंग ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (वय ९८)  यांचे आज मुंबईत सकाळी साडेसात वाजता हिंदुंजा रूग्णालयात निधन झाले.veteran actor dilipkumar dies at hinduja hospital

ता. २९ जून रोजी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठा दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आज सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो या त्यांच्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दिलीप कुमार यांनी १९४०- १९७० अशी तीन दशकं चित्रपटक्षेत्रावर अधिराज्य गाजविलं. यापूर्वीही त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांनी आजाराशी झुंज देत ते घरी परतले होते. ज्वार भाटा हा त्यांच्या पहिला चित्रपट होता. ते ट्रॅजेडी  किंग म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जन्म पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता. त्यांना दादासाहेब फाळकेसह अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले होते. 

 त्यांचं मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं पण ते जगभर दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले. अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख