JNU : वीर सावरकरांचे नाव रस्त्याला दिल्यामुळे गोंधळ

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला वीर सावरकर यांचे नाव दिल्यामुळे गोंधळ उडाला आहे.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला वीर सावरकर यांचे नाव दिल्यामुळे गोंधळ उडाला आहे.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला वीर सावरकर यांचे नाव दिल्यामुळे गोंधळ उडाला आहे.

पुणे - नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला वीर सावरकर यांचे नाव दिल्यामुळे गोंधळ उडाला आहे. 

जेएनयू स्टुडंटस युनियनच्या म्हणण्यानुसार विद्यापीठातून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला विद्यापीठ प्रशासनाने वीर सावरकर मार्ग असे नाव दिले आहे. तसा फलक या रस्त्यावर लावला. यापूर्वी या रस्त्याला कोणतेही नाव दिलेले नव्हते. परंतु, रविवारी रात्री या रस्त्याला वीर सावरकरांचे नाव दिलेले आढळले. विद्यापीठाच्या या निर्णयाचा धिक्कार या संघटनेने केला आहे.

विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेनेच रस्त्याला वीर सावरकरांचे नाव घेण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी सांगितल्याचे `वीक'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 

सावरकर मार्गाचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग केल्याचा दावा एनएसयुआयने केला आहे. एनएसयुआयचे सचिव सायमन फारुकी यांनी नामकरणाची छायाचित्रे ट्विट करीत म्हटले आहे, की रस्त्याला सावरकरांचे नाव देण्याच्या विरोधात एनएसयुआयने आंदोलन केले आहे. आम्ही रस्त्याचे नामकरण बी. आर. आंबेडकर असे केले आहे.

विद्यापीठातील रस्त्याच्या नावावरून सुरू झालेला गोंधळ आज आणखीनच वाढला आहे. आज सकाळी एका रस्त्यावर `महंमद अली जिना मार्ग' पोस्टर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याला जिनांचे नाव देण्याचा उद्योग जेएनयू स्टुडंट युनियनचा असल्याचा आरोप एबीव्हीपीने केला आहे. मात्र, द्वेष पसरवण्याच्या हेतून हे कृत्य एबीव्हीपीने केल्याचा प्रतिआरोप एनएसयुआयने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com