cm fadanvis and udaynraje will travel delhi together | Sarkarnama

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उदयनराजेंना घेऊन दिल्ली गाठणार!

अमोल कविटकर
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : हो,नाही म्हणता म्हणता भाजपच्या गळाला लागलेले साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले यांना पक्षाने 'रेड कार्पेट' टाकल्याचे दिसून येत आहेत. उदयनराजेंनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा सोडून उदयनराजेंना घेऊन दिल्ली गाठणार आहेत.

उदयनराजेंना दिल्लीला नेण्यासाठी मुख्यमंत्री आज (शुक्रवार) संध्याकाळी पुण्यात येत असून उद्या सकाळी (शनिवार) पुण्यातून काष्टी गाठत पुन्हा महाजनादेश यात्रा सुरू करणार आहेत.

गेला महिनाभर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत होती. मात्र गुरुवारी सकाळी उदयनराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्यानंतर उदयनराजे राष्ट्रवादीतच राहतील, अशी अटकळ बांधली गेली. मात्र पवारांच्या भेटीनंतर अवघ्या पाचच तासात उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची बातमी पुन्हा समोर आली.

आज रात्री ते खासदारकीचा राजीनामा देणार असून उद्या सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती उदयनराजे 'जय श्रीराम' करणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे आज संध्याकाळी खास विमानाने पुण्यातून दिल्लीला पोहोचणार आहेत. प्रवेशानंतर दोघेही पुन्हा पुण्याकडे येणार असून मुख्यमंत्री फडणवीस माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावातून महाजनादेश यात्रा सुरू करणार आहेत. त्यामुळे उद्या (शनिवारी) सकाळी नगरला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद रद्द होण्याची दाट शक्यता आहे. कारण पुण्यावरून मुख्यमंत्री थेट काष्टीला जाणार असून काष्टीमध्ये हेलिपॅडची तयारी सुरू करण्यात आली आहे.

वाचा आणखी बातमी- उदयनराजेंबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही : रामराजे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख