ramraje taunts udaynraje | Sarkarnama

उदयनराजेंबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही : रामराजेंची टोलेबाजी

सागर आव्हाड
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे हे भाजपच्या वाटेवर तर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. या दोन राजांचे एकमेकांबद्दलचे `प्रेम` जगजाहीर आहे.  राष्ट्रवादी सोडताना रामराजेंनी त्यानुसार टोलेबाजी केली. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज फलटण मध्ये महामेळावा आयोजित करत कार्यकर्ते जो निर्णय घेणार ते मला मान्य असेल, असे पत्रकारांशी सांगितले आहे.

हा मेळावा कार्यकर्त्यांचा आहे. सध्या ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्यामुळे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. त्यासाठी हा मेळावा आहे .निवडणूक जवळ आली की असे मेळावे होतात. राजकीय परस्थिती  बदलत आहे. त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे रामराजेंनी स्पष्ट केले. 

खासदार उदयनराजे यांच्याबद्दल बोलायची माझी लायकी नाही. त्यांना माझ्या  शुभेच्छा आहेत. ते काहीही करू शकतील. ते अबावू पार्टी पाॅलिटिक्स (राजकारणाच्या वर) आहेत. अबावू काॅन्स्टिट्यूटन (राज्यघटनेच्याही वर) आहेत. ते  आमच्या जिल्ह्यातील आहेत. याचा मला अभिमान आहे, अशी टोलेबाजी रामराजेंनी या वेळी केली.

त्यांनी शरद पवार हे आपले नेते असले तरी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, अशी भूमिका घेत ते राष्ट्रवादी काॅंग्रेसला रामराम करण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख