Baramati DYSP Caught morning Walkers in Lock Down Time and Gave Lecture | Sarkarnama

(व्हिडिओ) बारामतीकरांनो...तुम्हाला पोलिस मूर्ख वाटतात का....डीवायएसपींचा संतप्त सवाल

मिलिंद संगई
मंगळवार, 21 एप्रिल 2020

तुम्हाला काय वाटत आम्ही मूर्ख आहोत काय....देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलिस, प्रशासन तसेच सगळी माध्यमे घरात थांबा असे सांगत आहेत, ते तुम्हाला समजत नाही का...अनेकांनी तर मास्कही लावलेले नाही, अशा शब्दात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मॉर्निंग वॉकला येणा-या अतिउत्साही बारामतीकरांची आज सकाळी शाळाच घेतली. 

बारामती : तुम्हाला काय वाटत आम्ही मूर्ख आहोत काय....देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलिस, प्रशासन तसेच सगळी माध्यमे घरात थांबा असे सांगत आहेत, ते तुम्हाला समजत नाही का...अनेकांनी तर मास्कही लावलेले नाहीत, तुम्हाला असं वाटत का की तुम्हाला कोरोना होणारच नाही...तुमच्यामधील एक जण तरी असा आहे की तो उठून सांगू शकेल की मी कोरोनाग्रस्तांच्या फिरलो तरी मला कोरोना होणार नाही....तुम्हाला घरात बसून खूप कंटाळा आला असेल तर ससून रुग्णालयात लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला पाठवून देतो....नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा...का तुम्ही रस्त्यावर येता...अशा शब्दात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मॉर्निंग वॉकला येणा-या अतिउत्साही बारामतीकरांची आज सकाळी शाळाच घेतली. 

दिले शाब्दिक फटके, कारवाईचाही दाखवला धाक

सुरवातीला शाब्दिक फटके देत कारवाईचा धाक दाखवून नंतर समज देत त्यांनी जवळपास 313 जणांची मुक्तता केली.  या पुढे लॉकडाऊन संपेपर्यंत घराबाहेर पडणार नाही अशी शपथ घ्यायला लावत त्यांना पहिली संधी म्हणून समज देऊन नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी सोडून दिले. अनेक प्रतिष्ठितांनाही घराबाहेर पडू नका, असे सांगूनही ते ऐकत नसल्याने अखेर आज पोलिसांनी आपल्या भाषेत त्यांना समजून सांगितले. 

इव्हिनिंग वाॅकवरही असणार नजर

या पुढील काळात आता मॉर्निंग वॉकसह इव्हिनींग वॉक करणा-यांवरही पोलिसांची नजर असेल व या पुढील काळात कारवाईच केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहनही त्यांनी केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शेलार, फौजदार पदमराज गंपले, सचिन शिंदे, रमेश भोसले यांच्यासह 50 कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.

हे देखिल वाचा - लाॅकडाऊन उल्लंघन? आधी योगासने आणि मग कारवाई...बारामती पोलिसांचा नवा फंडा

बारामती  : शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या अतिउत्साही बारामतीकरांना आज पोलिसांनी आपला चांगलाच हिसका दाखवला. लॉक डाऊन काळात संचार बंदीचे उल्लंघन करून बिनधास्तपणे मॉर्निंग वॉक करणार्‍या स्त्री व पुरुषांसह 313 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. आज सकाळी पावणे सहा वाजता वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट लावून पोलिसांनी या नागरिकांना पकडले. यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा देखील समावेश आहे..

सविस्तर बातमी वाचण्यासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख