(व्हिडिओ) लाॅकडाऊन उल्लंघन? आधी योगासने आणि मग कारवाई...बारामती पोलिसांचा नवा फंडा

शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या अतिउत्साही बारामतीकरांना आज पोलिसांनी आपला चांगलाच हिसका दाखवला. लॉक डाऊन काळात संचार बंदीचे उल्लंघन करून बिनधास्तपणे मॉर्निंग वॉक करणार्‍या स्त्री व पुरुषांसह 313 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.
Police Took Action Agaisnt morning Walkers in Baramati
Police Took Action Agaisnt morning Walkers in Baramati

बारामती  : शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या अतिउत्साही बारामतीकरांना आज पोलिसांनी आपला चांगलाच हिसका दाखवला. लॉक डाऊन काळात संचार बंदीचे उल्लंघन करून बिनधास्तपणे मॉर्निंग वॉक करणार्‍या स्त्री व पुरुषांसह 313 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉर्निग वॉकसाठी जाणाऱ्या बारामतीकरांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पकडून चालत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आणले. या ठिकाणी या उत्साही बारामतीकरांच्या नावांची नोंदणी पोलिसांनी करून घेतली आणि त्यानंतर या सर्वांना त्यांनी योगासनांचे धडेदेखील दिले. वेळी या नागरिकांसोबत स्थानिक पोलिसांनीही योगासनांमध्ये सहभाग घेतला.

वारंवार सांगूनही सातत्याने लॉक डाउन चे उल्लंघन विविध क्षेत्रातील नागरिक करत होते. पोलिसांनी रात्रीच मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासंदर्भात नियोजन केलेले होते . आज सकाळी पावणे सहा वाजता वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट लावून पोलिसांनी या नागरिकांना पकडले. यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा देखील समावेश आहे. या सर्वांची नोंद पोलीस घेणार असून योग्य ती कारवाई करणार आहेत.

विनाकारण बाहेर फिरू नका

दरम्यान आगामी काही दिवसात मॉर्निंग आणि इविनिंग ह्या दोन्ही वॉक करणाऱ्या नागरिकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी विनाकरण रस्त्यावर फिरू नये असे वारंवार आवाहन करूनही त्याला प्रतिसाद देत नसल्याने नाईलाजाने कारवाईची भूमिका घ्यावी लागली, अशी माहिती पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली . या कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शेलार, फौजदार पदमराज गंपले, सचिन शिंदे, रमेश भोसले यांच्यासह 50 कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com