`धुळे-नंदुरबार'मधून भाजपतर्फे अमरिश पटेलांना उमेदवारी

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून भारतीय जनता पक्षातर्फे अमरिशभाई पटेल यांना अधिकृत उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे.
Amrish Patel gets BJP's ticket from Dhule and Nandurbar District Local Authorities Constituency
Amrish Patel gets BJP's ticket from Dhule and Nandurbar District Local Authorities Constituency

जळगाव : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून भारतीय जनता पक्षातर्फे अमरिशभाई पटेल यांना अधिकृत उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे.

कॉंग्रेसचे आमदार असलेले अमरिशभाई पटेल यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. गेल्या दोन टर्मपासून ते कॉंग्रेसतर्फे विधानपरिषदेवर आमदार होते. 

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ते एक दिग्गज नेते होते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे दोन्ही जिल्ह्यात कॉंग्रेसला फटका बसला आहे. भाजपतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी मिळणे निश्‍चित मानले जात होते. आज पक्षाचे प्रदेश कार्यालय मुंकूद कुळकर्णी यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात अमरिशभाई पटेल यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्या विरोधात आता महाआघाडीतर्फे कोण उमेदवार असणार याकडेच लक्ष असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवार (ता.13) शेवटची मुदत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com