तिथीनुसार शिवपूजन करण्यासाठी राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात उद्या तिथीनुसार शिवजंयती साजरी करण्याचानिर्णय घेतला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील त्यासाठी शहरात दाखल झाले आहेत.
Raj Thackeray will perform shivpooja in Aurangabad tomorrow
Raj Thackeray will perform shivpooja in Aurangabad tomorrow

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात उद्या तिथीनुसार शिवजंयती साजरी करण्याच निर्णय घेतला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील त्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. मात्र राज्यावर घोंगावत असलेले कोरोनाचे संकट पाहता मनसेच्या शिवजंयती मिरवणुकीस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता उद्या क्रांतीचौकात राज ठाकरे यांच्या हस्ते शिवपूजनचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे देखील आले असून मनसेने चिकलठाणा विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले.

१२ मार्च रोजी तिथीनूसार औरंगाबादेत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय झाल्यानंतर मनसेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली. शिवसेनेला जोरदार टक्कर देत महापालिका निवडणुकीत खाते उघडण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. शहराचे नाव संभाजीनगर करा हा शिवसेनेचा मुद्दा हायजॅक केल्यानंतर मनसेने औरंगाबादचा संवेदनशील राजकीय इतिहास पाहता आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे.

शिवजंयतीच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी देखील मनसेच्या वतीने सुरू होती. परंतु पुणे आणि मुंबईत कोरोनाचे काही संशयित आणि पॉझीटीव्ह रूग्ण आढळल्यामुळे राज्य सरकारने गर्दी जमले असे सगळेच कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार मनसेच्या उद्याच्या शिवजंयती मिरवणूकीला देखील परवनगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळी क्रांतीचौकात शिवपूनज केल्यानंतर दुपारी शहाराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती करून सायकांळी मिरवणूक काढण्यात येणार होती. अमित ठाकरे स्वःत या मिरवणूकीत सहभागी होणार होते. मात्र आता सकाळी शिवपूजन करूच राज व अमित ठाकरे परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com