Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची खिंड लढवणारे 'ते' 15 आमदार कोण?

अनुराधा धावडे

सुनील प्रभु -मालाड

राज्यातील सत्तांतराच्या काळापासून आजतागायत उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे सुनील प्रभू यांनी मांडली. शिवसेनेचे प्रतोद आणि निष्ठावान अशी त्यांची ओळख आहे.

Suni Prabhu | Sarkarnama

सुनिल राऊत - विक्रोळी

खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राऊत सत्तासंघर्षाच्या या लढाईत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत.

Sunil Raut | Sarkarnama

आदित्य ठाकरे - वरळी

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सुरत गाठलं तेव्हा पासून आदित्य ठाकरे वडील उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत.

Aditya Thackeray | Sarkarnama

भास्कर जाधव - गुहागर

शिवसेनेची तोफ अशी ओळख असलेले आणि बंडखोर आमदारांना थेट अंगावर घेणारे भास्कर जाधव ठाकरे गटाची खिंड लढवत आहेत

Bhaskar jadhav | Sarkarnama

रविंद्र वायकर - जोगेश्वरी

आमदार रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. २०२१ मध्ये ईडीने आठ तास चौकशी केली होती. पण तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

Ravindra Waikar | Sarkarnama

वैभव नाईक - कुडाळ

शिवसेनेचे जायंट किलर म्हणून वैभव नाईकांची ओळख आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर वैभव नाईकांनी कोकणात शिवसेनेचा गड राखला.

Vaibhav Naik | Sarkarnama

नितीन देशमुख - बालापूर

बंडखोरीच्या रात्री एकनाथ शिंदेसोबत सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये नितीन देशमुखही होते. पण ते दोन दिवसातच त्यांच्या गटातून निसटुन ठाकरेंकडे परत आले.

Nitin Deshmukh | Sarkarnama

कैलास पाटील - उस्मानाबाद

बंडखोरीच्या रात्री शिंदेंसोबत जाणाऱ्यामध्ये कैलास पाटीलही होते. पण सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिथून कशीबशी सुटका करुन घेतली. मिळेल त्या मार्गाने त्यांनी मुंबई गाठली आणि आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  

Kailas Patil | Sarkarnama

रमेश कोरगावकर - भांडूप

सत्तांतराच्या काळात भांडुप वेस्टचे आमदार रमेश कोरगावकर हेदेखील उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहिले.

Ramesh Korgaonkar | Sarkarnama

राजन साळवी - राजापूर

राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात. कोकणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदरांपैकी ठाकरेंसोबत जे आमदार आहेत त्यात राजन साळवी यांचं नाव येतं.

Rajan Salvi | Sarkarnama

संजय पोतनीस - कलिना

कलिना मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस आजही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत.

Sanjay Potnis | Sarkarnama

प्रकाश फातर्पेकर -चेंबूर

चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेला विजय मिळवून दिला. तेव्हापासून ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

Prakash Phatarpekar | Sarkarnama

अजय चौधरी- शिवडी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन हटवून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली.

Ajay Choudhari | Sarkarnama

उदयसिंह राजपूत - कन्नड

कन्नडचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत चार वेळा वेगवेगळ्या पक्षातून लढल्यानंर त्यांना २०१९ मध्ये शिवसेनेने संधी दिली आणि ते पहिल्यांदा निवडून आले. बंडखोरीच्या चर्चा सुरु असताना १५ वेळा उद्धव ठाकरेंना भेटल्याचं त्यांनी सांगितलं

Udaysingh Rajput | Sarkarnama

ऋतुजा लटके- अंधेरी

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आक्समिक निधनानंतर त्यांच्या जागी त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवली. लटके यांनी पहिल्यांदा मशाल चिन्हावर निवडणूक लढवली.

Rutuja Latke | Sarkarnama

Next : राजकारणात पित्याच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या लेकी अन् लेक