Vishal Phate Fraud Case: विशाल फटेचा नवा अवतार पुण्यात; पण फटे नेमका कोण होता?, काय केलं होतं त्यांनं

Rashmi Mane

सोलापूर जिल्हातील रहिवाशी

विशाल फटे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असल्याची माहिती आहे. बार्शीतील अलीपुर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता.

Vishal Phate | Sarkarnama

नेट कॅफेचा होता व्यवसाय

बार्शीतल्या शिवाजी महाविद्यालयासमोर त्याचे नेट कॅफे होते. मागील 10 ते 15 वर्षांपासून आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा.

Vishal Phate | Sarkarnama

वेगवेगळी ओळख

अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक, विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक, फोग्स ट्रेडिंग कंपनी व्यवस्थापकीय संचालक, NSEBSE चे सदस्य अशी वेगवेगळ्या संस्थांचे संस्थापक असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा.

Vishal Phate | Sarkarnama

काय आहे प्रकरण?

फटे हा लाखो रुपये लोकांकडून घेत होता. सुरुवातीला त्याने गुंतवणूकदारांना परतावा देखील दिला. परंतु नंतर जेव्हा लोक पैसे काढून घ्यायला जायचे तेव्हा आता काढू नका, एक दोन महिन्यात नवीन 'आयपीओ' येणार आहे असं सांगायचा.

Vishal Phate | Sarkarnama

आमिष दाखवून लाखोंचा गंडा

दहा लाख गुंतवल्यास वर्षाला सहा कोटी रुपयांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले

Vishal Phate | Sarkarnama

एका वाहिनीकडून पुरस्कार प्रदान

27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता, त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली होती.

Vishal Phate | Sarkarnama

'फटे स्कॅम'ची व्याप्ती मोठी

'फटे स्कॅम'ची व्याप्ती ऐवढी मोठी होती की त्या प्रकरणात डॉक्टर, पोलीस, पत्रकारांसह भले भले फसले होते.

Vishal Phate | Sarkarnama

Next : आदित्य ठाकरे हे महागड्या कारचे शौकीन, करोडोंचे मालक