Rashmi Mane
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या 'यंग ग्लोबल लीडर्स क्लास -2023' च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला आहे.
युवा सेनेचे अध्यक्ष असणारे आदित्य ठाकरे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे आणि राजकारणातील हालचालींंमुळे नेहमीच चर्चेत असतात.
आदित्य हे निवडणूक लढविणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य आहेत.
2019 च्या निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती आहे.
१० कोटी ३६ लाख रुपये बँकेतील गुंतवणूक आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे २ व्यावसायिक स्टोअर्स आहेत आणि कर्जतमध्ये काही एकर जमीन आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे अत्यंत आलिशान गाड्यांपैकी एक 'बीएमडब्ल्यू गाडी' आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे सोने चांदीचे दागिने इतर मौल्यवान वस्तु आहेत.